Kareena Kapoor Video: स्वॅगमध्ये बाहेर पडली करिना कपूर, गर्दीत कुणी ओढला तिचा हात तर कुणी पर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 15:09 IST2022-10-03T14:59:17+5:302022-10-03T15:09:03+5:30
करिना कपूरचा एअरपोर्टवरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात करिनाला एअरपोर्टवर चाहत्यांनी घेरल्याचे दिसतं आहे.

Kareena Kapoor Video: स्वॅगमध्ये बाहेर पडली करिना कपूर, गर्दीत कुणी ओढला तिचा हात तर कुणी पर्स
Kareena Kapoor: आपल्या आवडत्या स्टार्सची एक झलक पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. कधी कधी सेल्फी काढण्याच्या नादात संयम ही गमावून बसतात. करिना कपूरसोबत एअरपोर्टवर अशीच एक घटना घडली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
करिना कपूरचा एअरपोर्टवरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. करिनाला एअरपोर्टवर पाहताच चाहत्यांनी सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली आहे. एक व्यक्ती फोटो काढण्यासाठी अभिनेत्रीच्या अगदी जवळ आला होता. आपल्या इतक्या जवळ आलेल्या व्यक्तीला पाहून करीना कपूरही घाबरली. व्हिडिओमध्ये करिना एअरपोर्टवर चाहत्यांनी घेरल्याचे दिसतं आहे.
करिना कपूरच्या खांद्यावर एका चाहत्यांना हात ठेवून फोटो काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, करीनाच्या रक्षकांनी त्या माणसाचा हात धरून झटकले. करिनाला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी चाहते इतके उत्सुक होते की त्यामुळे तिला अवस्था वाटू लागले. कुणी करीना कपूर खानची बॅग खेचली तर कुणी जबरदस्तीने तिच्याकडे सेल्फी घेण्यासाठी आले.
एवढे सगळे करूनही करिनाने आपला संयम अजिबात गमावला नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी तिचं कौतुक करत आहेत. करीना कपूर कूल लूकमध्ये एअरपोर्टवर पोहोचली. पांढरा स्वेटर, पांढरा टी-शर्ट आणि पांढऱ्या ट्रॅकपँटमध्ये ती दिसली.
शूटिंगसाठी लंडनाला झाली रवाना
मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिना लंडनमध्ये दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी रवाना झाली आहे. हा एक मर्डर थ्रिलर आहे, ज्याची निर्मिती देखील करिना कपूर करत आहे. याशिवाय करिना 'द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स'च्या हिंदी व्हर्जनमध्ये दिसणार आहे.