अखेर 'द बकिंगहॅम मर्डर्स' ची रिलीज डेट लॉक, 'या' तारखेला थिएटर गाजवायला येणार करीना कपूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 09:10 AM2024-07-02T09:10:31+5:302024-07-02T09:11:00+5:30

लवकरच अभिनेत्रीचा 'द बकिंगहॅम मर्डर्स' नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Kareena Kapoor Khan Murder Mystery The Buckingham Murders Gets A Release Date | अखेर 'द बकिंगहॅम मर्डर्स' ची रिलीज डेट लॉक, 'या' तारखेला थिएटर गाजवायला येणार करीना कपूर

अखेर 'द बकिंगहॅम मर्डर्स' ची रिलीज डेट लॉक, 'या' तारखेला थिएटर गाजवायला येणार करीना कपूर

 The Buckingham Murders : बॉलिवूडची 'बेबो' अर्थात करीना कपूर ही कायमच चर्चेत असते. लवकरच अभिनेत्रीचा 'द बकिंगहॅम मर्डर्स' नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची रीलिज तारीख लॉक झाली आहे.  हंसल मेहता दिग्दर्शित 'द बकिंगहॅम मर्डर्स' चित्रपटाचे पोस्टर नुकतचं प्रदर्शित झालं. 

'द बकिंगहॅम मर्डर्स' (The Buckingham Murders) चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. कायमच आपल्या वैविध्यपूर्ण कथेसाठी आणि प्रयोगशील कृतीसाठी दिग्दर्शक हंसल मेहता चर्चेत असतात. या सिनेमात  करीना कपूर एका महिला गुप्तहेराची भूमिका साकारत आहे, तिचे नाव जस भामरा आहे. हा चित्रपट 13 सप्टेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हा चित्रपट एक जबरदस्त थ्रिलर सिनेमा असून प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. पोस्टर शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'आम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, द बकिंगहॅम मर्डर्स 13 सप्टेंबरला थिएटरमध्ये येत आहे, ज्याचे दिग्दर्शन हंसल मेहता करत आहेत आणि यात करीना कपूर प्रमुख भूमिकेत आहे'.

प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटाने जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. मामी चित्रपट महोत्सव २०२३ च्या ओपनिंगचा मान या चित्रपटाने पटकावला होता. करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर,  लाल सिंह चड्ढानंतर अभिनेत्री 'जाने जान' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.  'द बकिंगहॅम मर्डर्स' शिवाय करीना ही 'सिंघम अगेन'मध्येही झळकणार आहे.  

Web Title: Kareena Kapoor Khan Murder Mystery The Buckingham Murders Gets A Release Date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.