ते निष्पाप बाळ,जरा विचार करा…; मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवल्यानं ट्रोल झालेली करिना अखेर बोलली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 11:27 AM2021-08-13T11:27:03+5:302021-08-13T11:29:36+5:30
धाकट्या लेकाच्या नावाचा खुलासा झाला आणि अनेकांनी करिनाला ट्रोल करायला सुरूवात केली. तिच्यासोबत सैफ अली खानही ट्रोल झाला. लोकांनी नको त्या कमेंट्स करत, सैफिनाला फैलावर घेतलं.
बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूर (Kareena Kapoor Khan) सध्या ट्रोल होतेय. काही महिन्यांपूर्वी बेबोनं दुसऱ्या मुलाला जन्म दिला. आपल्या या मुलाचं नाव तिनं ‘जहांगीर’ (Jehangir Ali Khan) असं ठेवलं आहे. तिच्या या धाकट्या लेकाच्या नावाचा खुलासा झाला आणि अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. तिच्यासोबत सैफ अली खानही ट्रोल झाला. लोकांनी नको त्या कमेंट्स करत, सैफिनाला फैलावर घेतलं.
आता करिनाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत ती यावर बोलली.
‘मी ट्रोलर्सच्या नकारात्मक प्रतिक्रियांकडे अजिबात लक्ष देत नाही. कारण मी एक पॉझिटीव्ह व्यक्ति आहे. कोरोना महामारीमुळे जगभर भयावह परिस्थिती आहेत. वातावरण आधीच नको इतकं नकारात्मक बनलं आहे. त्यामुळे मी अशा गोष्टींकडे सरळ सरळ दुर्लक्ष करते. आता माझ्याकडे एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे मेडिटेशन. मला लवकरात लवकर मेडिटेशन सुरू करावं लागेल. नकारात्मकता दूर पळवण्यासाठीचा हा उत्तम मार्ग आहे. लोक ज्यांच्याबद्दल बोलताहेत, ते दोन निरागस मुलं आहेत. आपल्याबद्दल कोण काय बोलतंय, हे त्यांना कळतंही नाही. अर्थात अशाही स्थितीत आम्ही आनंदी आणि सकारात्मक राहणार आहोत,’ असं करिना म्हणाली.
2016 मध्ये करिनाने पहिल्या मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव तैमूर (Taimur Ali Khan) ठेवल्याचे तिने जाहिर करताच, अनेकांनी या नावावर आक्षेप घेतला होता. यावरून करिना व सैफ दोघेही प्रचंड ट्रोल झाले होते. तैमूर लंग चौदाव्या शतकाचा एक शासक होता ज्यानं तैमुरी घराण्याची स्थापना केली होती. तो खूप अत्याचारी आणि निर्दयी असल्याचे म्हटलं जातं. सैफिनाने अशा शासकाच्या नावावर आपल्या मुलाचं नाव ठेवावं, यावर लोकांचा आक्षेप होता. या वादानंतर सैफने एका क्षणाला तैमूर हे नाव बदलण्याचाही विचार केला होता. पण करिनाचा याला विरोध होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर करिना व सैफने आपल्या दुस-या मुलाचे नाव अधिकृतपणे जाहिर केलेले नाही. शिवाय अद्याप त्याचा चेहराही जगाला दाखवलेला नाही.