आता करिअर संपले,असेच त्यावेळी वाटले...! करिअरवर बोलली करिना कपूर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 12:04 PM2019-04-25T12:04:53+5:302019-04-25T12:05:38+5:30

आपल्या अनेक वर्षांच्या करिअरमध्ये बेबोने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिलेत. पण याचदरम्यान एक वेळ अशीही आली, जेव्हा सगळेच संपले, असे करिनाला वाटले.

kareena kapoor khan remembers the time when she felt her career is over |  आता करिअर संपले,असेच त्यावेळी वाटले...! करिअरवर बोलली करिना कपूर!!

 आता करिअर संपले,असेच त्यावेळी वाटले...! करिअरवर बोलली करिना कपूर!!

googlenewsNext
ठळक मुद्दे२००७ मध्ये करिनाने आयुष्यातल्या या काळावर मात करत, पुन्हा नव्या जोमाने वापसी केली. ‘जब वी मेट’ या चित्रपटाने तिच्या करिअरला गती दिली.

बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे करिना कपूर. बेबो नावाने ओळखल्या जाणा-या करिनाने २००० मध्ये ‘रिफ्युजी’ या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. यानंतर २००१ मध्ये ती ‘कभी खुशी कभी गम’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात झळकली. आपल्या अनेक वर्षांच्या करिअरमध्ये बेबोने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिलेत. पण याचदरम्यान एक वेळ अशीही आली, जेव्हा सगळेच संपले, असे करिनाला वाटले. होय, खुद्द करिनाने ह्युमन आॅफ बॉम्बे या फेसबुकवर पेजवर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये याबाबतचा खुलासा केला आहे.


माझ्या करिअरची सुरुवात फार चांगली होती. मी अनेक शानदार चित्रपट दिलेत. पण एक वेळ अशीही होती, जेव्हा मी एकही चित्रपट केला नाही. माझे करिअर आता संपले, असे मला वाटू लागले. मी नव्या दमाने सुरुवात करावी, साईज झिरोचा फंडा वापरावा, असा सल्ला याकाळात मला अनेकांनी दिला. कदाचित प्रत्येकाच्या करिअरमध्ये हे असे एक वळण येते. लोक सल्ला देतात. पण हे वळण तुम्हाला एकट्याने पार करायचे असते. हा काळ अतिशय वाईट असतो. सगळ्या नजरा तुमच्यावर असतात, असे करिनाने या पोस्टमध्ये लिहिले आहे.
 २००७ मध्ये करिनाने आयुष्यातल्या या काळावर मात करत, पुन्हा नव्या जोमाने वापसी केली. ‘जब वी मेट’ या चित्रपटाने तिच्या करिअरला गती दिली. यानंतर तिला अनेक चित्रपट मिळाले. यापैकी अनेक चित्रपट बॉक्सआॅफिसवर फ्लॉप ठरलेत. पण युवा, गोलमाल रिटर्न्स, ३ इडियट्स, गोलमाल ३, बॉडीगार्ड, सिंघम रिटर्न्स, बजरंगी भाईजान या चित्रपटातून तिने मिळवायचे ते यश मिळवलेच.

Web Title: kareena kapoor khan remembers the time when she felt her career is over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.