बॉलिवूडच्या या अभिनेत्याला सर्वात आधी माहित होतं करीना व सैफच्या नात्याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 04:51 PM2019-12-07T16:51:54+5:302019-12-07T16:52:46+5:30
करीनाला सैफ आवडत असल्याचं या अभिनेत्याला माहित होतं. मात्र त्याने ही गोष्ट ठेवली सीक्रेट
बॉलिवूडची बेबो करीना कपूर आणि छोटे नवाब सैफ अली खान सिनेसृष्टीतील पॉवर कपल मानलं जाते. हे पॉवर कपल कोणत्या-ना-कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. या दोघांच्या लग्नाला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. महत्वाचं म्हणजे सैफीना यांच्यात १० वर्षांच अंतर आहे. मात्र या दोघांच्या नात्यात याचा कोणताच फरक पडलेला नाही. नुकतच करीना आणि सैफच्या नात्याबद्दल करीनाने खूप मोठी गोष्ट सांगितली आहे. जी या सात वर्षात कुणालाच माहित नव्हती.
करीना कपूरने हिंदुस्तान टाईम्सच्या समिट २०१९मध्ये खुलासा केला. त्यावेळी तिथे अक्षय कुमारही उपस्थित होता. या कार्यक्रमात करीनाने सैफ आणि तिच्या खासगी आयुष्याबद्दलची महत्वाची गोष्ट शेअर केली. सैफ-करीनाच्या नात्याबद्दल सगळ्यात अगोदर माहित असलेली व्यक्ती म्हणजे अक्षय कुमार. करीनाच्या मनात सैफबद्दल प्रेमाची भावना होती ही गोष्ट सर्वात अगोदर बॉलिवूडमध्ये फक्त अक्षयला माहित होती. महत्वाचं म्हणजे अक्षयने देखील ही गोष्ट सिक्रेट ठेवली होती.
करीना म्हणाली की, अक्षय माझा खूप चांगला मित्र आहे. मला त्याची हीच गोष्ट खूप आवडते. अक्षयला सगळ्या गोष्टी माहित असून त्याने कधीच कुणाला काही सांगितलं नाही.
अक्षय आणि करीनाचा 'गुड न्यूज' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'गुड न्यूज' सिनेमात करीना व अक्षयसोबत दलजीत दोसांझ व कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
अक्षय कुमार व करीना कपूर या जोडीची केमिस्ट्री रसिकांना खूप भावली होती आणि पुन्हा एकदा 'गुड न्यूज' सिनेमाच्या निमित्ताने त्या दोघांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. हा सिनेमा २७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.