बॉलिवूडची 'बेबो' करीना कपूर म्हणते, "मला बोटॉक्स, सर्जरीची गरज नाही..."; दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 09:23 AM2024-09-11T09:23:48+5:302024-09-11T09:25:21+5:30

४४ वर्षांच्या करीनाने दिला मोलाचा सल्ला; म्हणाली, 'वाढतं वय हे...'

Kareena Kapoor Khan says she dosent feel like doing botox or other cosmetic enhancements | बॉलिवूडची 'बेबो' करीना कपूर म्हणते, "मला बोटॉक्स, सर्जरीची गरज नाही..."; दिला मोलाचा सल्ला

बॉलिवूडची 'बेबो' करीना कपूर म्हणते, "मला बोटॉक्स, सर्जरीची गरज नाही..."; दिला मोलाचा सल्ला

अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ४४ वर्षांची आहे. या वयातही ती कमालीची फीट आणि सुंदर आहे. पंजाबी असल्याने आपसूकच तिच्या चेहऱ्यावर कायमच एक तेज पाहायला मिळतं. सध्या बोटॉक्स, फिलर्स या कॉस्मेटिक सर्जरी करण्याचा जणू ट्रेंडच आला आहे. पण या सर्जरीची मला गरजच नाही असं विधान नुकतंच करीनाने केलं. नक्की काय म्हणाली करीना?

'हार्पर्स बाजार' ला दिलेल्या मुलाखतीत करीना कपूर म्हणाली, "मला सुरुवातीपासूनच माझ्या टॅलेंट आणि मेहनतीमुळे काम मिळेल असा विश्वास होता. मी स्वत:ची काळजी घेतली, फीट राहिले आणि करिअरकडे लक्ष दिलं. सेल्फ केअर म्हणजेच स्वत:साठी पुरेसा वेळ देणं. मग ते मित्रमंडळींसोबत वेळ घालवणं असो किंवा सैफसोबत स्वयंपाक करणं असो किंवा व्यायाम करणं. तुम्हाला काय करुन छान वाटेल हे महत्वाचं आहे. चांगलं अन्न, एखाद्यासोबत मनसोक्त गप्पा आणि वाईनची एक बॉटल हे माझ्यासाठी पुरेसं असतं."


ती पुढे म्हणाली, "वय हा सौंदर्याचा भागचच आहे. तुम्ही कायम तरुम दिसण्यासाठी प्रयत्न करु नका. त्यापेक्षा आहे ते वय एन्जॉय करा. मी ४४ वर्षांची आहे आणि मला याआधी इतकं छान कधीच वाटलं नसेल. मला बोटॉक्स आणि इतर कॉस्मेटिक सर्जरीची गरज नाही. माझ्या नवऱ्याला मी अशीच आवडते. माझे मित्र मला तू कमाल दिसते असं म्हणतात आणि माझे चित्रपटही चांगले चालत आहेत. मी आहे तशी लोकांनी माझ्याकडे पाहावं आणि कौतुक करावं."

करीना कपूरच्या या वक्तव्याचं कौतुक होतंय. आपल्या वाढत्या वयाला आहे तसं स्वीकारा हा मोलाचा सल्ला तिने सर्वांना दिला आहे. करीनाचा 'द बर्किंघम मर्डर्स' हा सिनेमा रिलीज होतोय. यामध्ये तिने गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे.

Web Title: Kareena Kapoor Khan says she dosent feel like doing botox or other cosmetic enhancements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.