Video : करीना कपूरचा उद्धटपणा! चाहती सेल्फी मागत होती पण ही बया...नेटकऱ्यांनी सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 11:17 AM2023-05-31T11:17:58+5:302023-05-31T11:18:42+5:30

करीना कपूर खानचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये ती सेल्फी मागणाऱ्या चाहतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसते.

kareena kapoor khan showed attitude and ignored a lady fan who was behind her for selfie | Video : करीना कपूरचा उद्धटपणा! चाहती सेल्फी मागत होती पण ही बया...नेटकऱ्यांनी सुनावले खडेबोल

Video : करीना कपूरचा उद्धटपणा! चाहती सेल्फी मागत होती पण ही बया...नेटकऱ्यांनी सुनावले खडेबोल

googlenewsNext

भारतात सेलिब्रिटींसोबत सेल्फी घेण्यासाठी धडपडणारे लोक बरेच आहेत. काही सेलिब्रिटी आनंदाने थांबून सेल्फी देतातही पण काही कलाकार मात्र अनेकदा उद्धटपणे वागताना दिसतात. विमानतळावर बऱ्याचदा बॉलिवूड कलाकार दिसतात तेव्हा सामान्य लोक त्यांच्यामागे सेल्फीसाठी धावतात. असे व्हिडिओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या करीना कपूर खानचा (Kareena Kapoor Khan) एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये ती सेल्फी मागणाऱ्या चाहतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसते.

करीना नुकतीच मुंबई विमानतळावर आली आणि पापाराझींनी नेहमीप्रमाणे तिचा व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली. यावेळी एक चाहती करिनाच्या मागे मागे येत होती आणि सेल्फी प्लीज, सेल्फी प्लीज असं म्हणत होती. यावेळी करीनाच्या मागे थोडीसुद्धा गर्दी नव्हती त्यामुळे तिला आरामात सेल्फी देता आला असता. मात्र करीनाने तिचा अॅटिट्यूड दाखवत चाहतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. अखेर चाहतीला सेल्फी न घेताच माघारी जावं लागलं. करीनाचा हा व्हिडिओ इन्स्टंट बॉलिवूड या सोशल मीडिया पेजवर पोस्ट करण्यात आला आहे.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'चाहत्यांशिवाय तू काहीच नाहीएस करीना','सर्वात उद्धट सेलिब्रिटी,'हिची फक्त साईज झिरो नाही तर ही स्वत: झिरो आहे' अशा संतप्त प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केल्या आहेत. या व्हिडिओमुळे करीना कपूर चांगलीच ट्रोल होताना दिसतेय.

Web Title: kareena kapoor khan showed attitude and ignored a lady fan who was behind her for selfie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.