भविष्यवाणी! अ‍ॅक्टिंग नाही ‘या’ क्षेत्रात जाणार करिना कपूरचा लहान मुलगा जेह 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 05:49 PM2021-07-15T17:49:05+5:302021-07-15T17:51:10+5:30

Numerologist Predicts Kareena's son Jeh future: करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा मोठा मुलगा तैमूर सतत चर्चेत असतो. आता काय तर सैफिनाचा लहान मुलगा जेह हा सुद्धा चर्चेत आला आहे.

kareena kapoor khan son jeh future prediction numerologist says jeh has a bright future in politics | भविष्यवाणी! अ‍ॅक्टिंग नाही ‘या’ क्षेत्रात जाणार करिना कपूरचा लहान मुलगा जेह 

भविष्यवाणी! अ‍ॅक्टिंग नाही ‘या’ क्षेत्रात जाणार करिना कपूरचा लहान मुलगा जेह 

googlenewsNext
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वीच करिनाने आपल्या दुस-या बाळाचे नाव जेह ठेवल्याचे समोर आले आणि  भविष्यवेत्त्यांनी त्याची भविष्यवाणी सुरू केली.

करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा मोठा मुलगा तैमूर सतत  चर्चेत असतो. आता काय तर सैफिनाचा लहान मुलगा जेह (Jeh) हा सुद्धा चर्चेत आला आहे. 21 फेबु्रवारी 2021 रोजी करिनानं दुस-या मुलाला जन्म दिला. त्याचे काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत. शिवाय जेह भविष्यात काय होणार, याचे भाकितही वर्तवले जात आहे.
काही दिवसांपूर्वीच करिनाने आपल्या दुस-या बाळाचे नाव जेह ठेवल्याचे समोर आले आणि  भविष्यवेत्त्यांनी त्याची भविष्यवाणी सुरू केली. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या जेहचे भविष्य उज्ज्वल आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाहीच. पण फक्त इतकेच नाही. जेह आई-बाबासारखा अ‍ॅक्टर बनेल सोबत अन्य एका क्षेत्रातही नाव कमवणार असल्याचे भाकित न्यूमरॉलॉजिस्टअंजली पी जैन यांनी वर्तवलं आहे. (Numerologist Predicts Kareena's son Jeh future )

‘बॉलिवूड लाईफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अंजली पी जैन यांनी जेह अभिनय क्षेत्रातसोबतच राजकारणात जाणार असल्याची भविष्यवाणी केली आहे.

‘जेह आयुष्यात महान काम करण्यासाठी जन्मला आहे. त्याच्यात नेतृत्वगुण असतील आणि त्याच्यासोबत राहणारा प्रत्येकजण या नेतृत्वगुणांनी भारावून जाईल. राजकारणात तो पाऊल ठेवेल आणि या क्षेत्रात त्याला अपार यश मिळेल. अभिनय क्षेत्रातही तो काम करेल. तो एक संस्कारी मुलगा असणार आणि त्याचा फॅशन सेन्स जबरदस्त असेल. जग पाहण्याची  महत्त्वाकांक्षा असलेला जेह जगाच्या ज्या कोण्या कोपºयात जाईल, तिथे तो आपल्या चार्मने लोकांना प्रभावित करेल, ’ असा दावा अंजली पी. जैन यांनी केला आहे.

Web Title: kareena kapoor khan son jeh future prediction numerologist says jeh has a bright future in politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.