"भोलेनाथ आयुष्यातून..." महाशिवरात्रीला अभिनेत्री करीना कपूर खानची पोस्ट, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 15:57 IST2025-02-26T15:56:53+5:302025-02-26T15:57:14+5:30
करीना कपूर खानने महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

"भोलेनाथ आयुष्यातून..." महाशिवरात्रीला अभिनेत्री करीना कपूर खानची पोस्ट, म्हणाली...
Kareena Kapoor Khan: शिव हे हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक आहे. हिंदू पंचांगानुसार यंदा महाशिवरात्री (Mahashivratri 2025) २६ फेब्रुवारीला साजरी केली जात आहे. फाल्गुन महिन्याच्या कृष्णपक्षातील चतुर्दशीस महाशिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी शिव व पार्वती यांचा विवाह सोहळा पार पडला होता, अशी पौराणिक मान्यता आहे. दरवर्षी शिवभक्त यादिवसाची आतुरतेने वाट बघत असतात. हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेसाठी आणि आराधनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या महाशिवरात्रीचं औचित्य साधत अभिनेत्री करीना कपूर खानने (Kareena Kapoor Khan) खास पोस्ट शेअर केली आहे
करीना कपूर खानने चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर शंकराचा फोटो शेअर केला आहे. तर कॅप्शनमध्ये "भोलेनाथ तुमच्या आयुष्यातून सर्व दुःख दूर करो... महाशिवरात्रीच्या शुभेच्छा" असं अभिनेत्रीने लिहिलं आहे. अलिकडेच करीनाच्या कुटुंबावर मोठं सकंट आलं होतं होतं. तिचा पती सैफ अली खानवर राहत्या घरात चोराने चाकू हल्ला केला होता. या घटनेतून आता तिचं कुटुंब सावरत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तिने बऱ्याच कठीण प्रसंगांचा सामना केला.
करीना ही जेवढी ग्लॅमरस आहे, तेवढीच ती अध्यात्मिक सुद्धा आहे. करीना ही पतौडी घराण्याची सून असली तरी ती होळी ते ईद प्रत्येक सण उत्साहात साजरा करते. करीनाचे वडील हे पंजाबी आहेत, तर तिची आई ही ख्रिश्चन आहे. तर आपल्या आईप्रमाणे करीना ख्रिश्चन धर्माचंही पालन करते. आपल्या मुलांनाही ती प्रत्येक धर्माची शिकवण देते. पंजाबी कुटुंबात जन्म झालेल्या करीनाने मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या सैफ अली खानशी लग्न केलं आणि २०१२ साली ती पतौडी घराण्याची सून झाली होती.
करीनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची 'सिंघम अगेन' सिनेमात दिसली होती. त्याआधी ती हंसल मेहता दिग्दर्शित 'द बकिंघम मर्डर्स' चित्रपटात पाहायला मिळाली होती. करीना कपूरच्या चाहत्यांची संख्या भारतातचं नाही तर, परदेशात देखील फार मोठी आहे. दोन मुलांची आई असूनही करीना मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे. तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आजही तितकेच उत्सुक असतात.