15 फेब्रुवारीला होणार करिना कपूर खानची डिलिव्हरी? वडील रणधीर कपूर यांनी दिली माहिती, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 03:56 PM2021-02-10T15:56:41+5:302021-02-10T15:57:13+5:30

हे करिना आणि सैफचे दुसरे मूल असेल. पण, सैफ अली खानचे हे चौथे मूल असेल. करिना आणि सैफ यांनी ऑगस्त 2020मध्ये दुसऱ्या मुलासंदर्भात अनाउंसमेन्ट केली होती. (Kareena Kapoor Khan)

Kareena Kapoor Khan's delivery on February 15 Information given by father Randhir Kapoor | 15 फेब्रुवारीला होणार करिना कपूर खानची डिलिव्हरी? वडील रणधीर कपूर यांनी दिली माहिती, म्हणाले...

15 फेब्रुवारीला होणार करिना कपूर खानची डिलिव्हरी? वडील रणधीर कपूर यांनी दिली माहिती, म्हणाले...

googlenewsNext

अ‍ॅक्ट्रेस करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) तिच्या प्रेग्नंसीमुळे सध्या चर्चेत आहे. तिचे बेबी बंपचे फोटोही व्हायरल झाले आहेत. 15 फेब्रुवारीला तिची डिलिव्हरी होऊ शकते. यानंदर्भात खुद्द तिचे वडील रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांनी नुकतीच माहिती दिली आहे. (Kareena Kapoor Khan's delivery on February 15 Information given by father Randhir Kapoor)
 
एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, रणधीर कपूर यांनी करिनाची ड्यू डेट 15 फेब्रुवारीच्या जवळपास असल्याचे सांगितले आहे. तत्पूर्वी सैफ अली खाननेही (Saif Ali Khan) करिनाची डिलिव्हरी फेब्रुवारीमध्ये होईल, असे म्हटले होते.

हे करिना आणि सैफचे दुसरे मूल असेल. त्यांना एक मुलगाही आहे. त्यांच्या मुलाचे नाव तैमूर आहे. तैमूर हा सोशल मीडियावर स्टार आहे. तैमूरचा जन्म 20 डिसेंबर 2016 मध्ये झाला होता. तसे पाहता, सैफ अली खानचे हे चौथे मूल असेल. यापूर्वी पहिली पत्नी अमृता सिंहकडून त्याला दोन मनलं आहेत. काही दिवसांपूर्वी सैफने पॅटरनिटी लीव्हसंदर्भातही भाष्य केले आहे. 

Elle मॅक्झिन सोबत बोलताना सैफ म्हणाला, 'जेव्हा घरी न्यू बॉर्न बेबी असेल, तेव्हा काम कुणाला करावे वाटेल. आपण आपल्या मुलाला वाढताना पाहत नसाल तर, आपण चूक करत आहात. मी कामातून वेळ काढू शकतो, ही एक प्रिव्हिलेज पोझिशन आहे. 9 ते 5चे रूटीन फॉलो करण्याऐवजी मी एका अ‍ॅक्टर सारखेच जगतो.' 

करिना आणि सैफ यांनी ऑगस्त 2020मध्ये दुसऱ्या मुलासंदर्भात अनाउंसमेन्ट केली होती. करिनाचे काका राजीव कपूर यांचे 9 फेब्रुवारीला निधन झाले आहे. यावेळी करिना दिसून आली होती.

Web Title: Kareena Kapoor Khan's delivery on February 15 Information given by father Randhir Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.