तैमूरच्या वाढदिवशी करिना कपूरने चाहत्यांना दिले रिटर्न गिफ्ट, काय ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 05:52 PM2020-12-20T17:52:51+5:302020-12-20T17:53:29+5:30

होय, आज मुलगा तैमूरच्या वाढदिवसाचे औचित्य साधत करिनाने नवी घोषणा केली आहे.

kareena kapoor khans new book pregnancy bible will published in 2021 | तैमूरच्या वाढदिवशी करिना कपूरने चाहत्यांना दिले रिटर्न गिफ्ट, काय ते वाचा!

तैमूरच्या वाढदिवशी करिना कपूरने चाहत्यांना दिले रिटर्न गिफ्ट, काय ते वाचा!

googlenewsNext

बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूर आता केवळ अभिनेत्री नाही तर लेखिका म्हणूनही ओळखली जाणार आहे. होय, आज मुलगा तैमूर याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत करिनाने आपल्या पहिल्या पुस्तकाची घोषणा केली आहे.   Pregnancy Bibleअसे या पुस्तकाचे नाव असून पुढील वर्षी हे पुस्तक प्रकाशित होणार आहे.  
 Pregnancy Bible हे करीनाचे पहिलेवहिले पुस्तक  गरोदरपणाबद्दल आहे. त्यामुळे नव्याने आई होणा-या प्रत्येकीसाठी हे पुस्तक अगदी खास ठरणार आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करत करीनाने आपल्या नव्या पुस्तकाबद्दल ची माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली.
‘माझ्या पुस्तकाची Pregnancy Bible for All Moms-to-Be  ची घोषणा करण्यासाठी आजचा दिवस एकदम परफेक्ट आहे. यात मी सर्व गोष्टींबद्दल लिहिले आहे. अगदी मॉर्निंग सिकनेस, डाएट ते फिटनेस. तुम्ही हे पुस्तक कधी वाचाल, असे मला झाले आहे,’ असे तिने म्हटले आहे.

करिना कपूर लवकरच दुस-यांदा आई होणार आहे, हे तुम्हाला माहितच आहे. या पुस्तकात करिनाने तैमूर या आपल्या पहिल्या मुलाच्या जन्माआधीच्या 9 महिन्यांपासून तर आत्ता दुस-यांदा आई बनण्यापर्यंतच्या अनुभवाबद्दल लिहिले आहे.
 बेबो सध्या प्रेग्नंसी एन्जॉयकरते. यादरम्यान ती नियमितपणे बेबी बम्पसह स्वत:चे फोटो शेअर करत असते.  12 आॅगस्ट रोजी करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी प्रेग्नेंसीची घोषणा केली होती.तिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर करीना तिने नुकतेच तिच्या आगामी सिनेमा ‘लाल सिंह चड्ढा’ चे  शूटिंग पूर्ण केले. या सिनेमात करीना सोबत आमिर खान प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

Web Title: kareena kapoor khans new book pregnancy bible will published in 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.