'त्या' घटनेनंतर करीनाला आवडेनाशी झाली होळी; बऱ्याच वर्षांनंतर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 04:09 PM2022-03-17T16:09:16+5:302022-03-17T16:09:45+5:30

Kareena kapoor: रंगांचा सण अभिनेत्री करीना कपूर-खानला फारसा आवडत नाही. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांमध्ये ती होळीपासून दूर असल्याचं पाहायला मिळतं.

kareena kapoor misses her dada raj kapoor on holi shared her feelings | 'त्या' घटनेनंतर करीनाला आवडेनाशी झाली होळी; बऱ्याच वर्षांनंतर केला खुलासा

'त्या' घटनेनंतर करीनाला आवडेनाशी झाली होळी; बऱ्याच वर्षांनंतर केला खुलासा

googlenewsNext

होळी म्हटलं की सगळीकडे आनंदाचं, चैतन्याचं, उत्साहाचं वातावरण असतं. रंगबीरंगी रंगांमध्ये सगळा आसमंत उजळून निघाला असतो. त्यातच होळी आणि बॉलिवूड यांचं जवळचं नातं आहे. अनेक चित्रपटांमध्येही होळीचा, रंगपंचमीचा उत्साह दाखवण्यात आला आहे. तसंच अनेक दिग्गज सेलिब्रिटींकडेही होळी पार्टीचं आयोजन केलं जातं. त्यामुळे होळी हा बॉलिवूडमधील सर्वात मोठा सण मानला जातो. परंतु, हा रंगांचा सण अभिनेत्री करीना कपूर-खानला फारसा आवडत नाही. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांमध्ये ती होळीपासून दूर असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे तिला होळी न आवडण्यामागेही एक कारण आहे. एका मुलाखतीत तिने हे कारण सांगितलं.

एकेकाळी कपूर कुटुंबात मोठ्या दणक्यात होळी साजरी केली जायची. त्यावेळी राज कपूर त्यांच्या आर. के. स्टुडिओमध्ये होळी पार्टीचं आयोजन करायचे. या पार्टीमध्ये कलाविश्वातील अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित असायचे. विशेष म्हणजे या पार्टीमध्ये करीनादेखील असायची मात्र, आजोबा राज कपूर यांच्या निधनानंतर करीनाने होळी खेळणं बंद केलं.

"आजोबांच्या निधनानंतर आमच्या कुटुंबात होळीचा रंग फिका झाला आहे. त्यांच्याशिवाय होळी साजरी करणं हे मुळात आम्हाला मान्यच नाही. त्यामुळे, मी होळी खेळत नाही", असं करीना म्हणाली होती.

दरम्यान, सैफ अली खानची लग्न झाल्यानंतर करीना तिच्या मुलांसाठी पुन्हा होळी खेळू लागली. मात्र, राज कपूर यांच्यावेळी जो उत्साह असायचा तो आजही तिच्या चेहऱ्यावर नसतो.
 

Web Title: kareena kapoor misses her dada raj kapoor on holi shared her feelings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.