महागड्या गाड्या, आलिशान घरं, एका सिनेमासाठी घेते गडगंज मानधन, बेबोचं नेटवर्थ जाणून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 06:06 PM2023-09-19T18:06:14+5:302023-09-19T18:16:21+5:30

बॉलिवूडची ‘पॉव्हरफूल’ अभिनेत्री म्हणून करीना कपूर हिची ओळख आहे.

Kareena Kapoor Net Worth, Salary, House | महागड्या गाड्या, आलिशान घरं, एका सिनेमासाठी घेते गडगंज मानधन, बेबोचं नेटवर्थ जाणून व्हाल थक्क

Kareena Kapoor

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये फक्त अभिनेतेच नाही तर अनेक अभिनेत्री देखील गडगंज संपत्तीच्या मालक आहेत. स्वतःची जिद्द आणि मेहनतीच्या बळावर बॉलिवूडमध्ये भक्कम स्थाव निर्माण केलं. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे बॉलिवूडची 'बेबो अर्थात करीना कपूर. करीना कपूर हिने अनेक सिनेमांमध्ये काम करत चाहत्यांच्या मनात घर केलं. बॉलिवूडची ‘पॉव्हरफूल’ अभिनेत्री म्हणून करीना कपूर हिची ओळख आहे. करीना कपूरने हिने ‘रिफ्यूजी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर करिनाने कधीही मागे वळून पाहिलं नाही. आज आपण करीनाच्या नेटवर्थबद्दल जाणून घेवू.

सध्या करीना कपूर आपल्या  'जाने जान' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. कपूर घराण्यातील करीना नेहमीच लग्झरी लाइफ जगत आली आहे.  सैफ अली खानशी लग्न करताच ती नवाब घराण्याची सून बनली. 23 वर्षांच्या आपल्या फिल्मी करिअरमध्ये करीनाने 'मुझे कुछ कहना है, हलचल, गोलमाल रिटर्न्स, 3 इडियट्स, बॉडीगार्ड आणि बजरंगी भाईजान' सारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

caknowledge च्या अहवालानुसार, करीना कपूरची एकूण संपत्ती सुमारे 60 मिलियन डॉलर्स आहे. जी भारतीय रुपयांनुसार सुमारे 485-490 कोटी रुपये आहे. अभिनेत्रीची वार्षिक कमाई सुमारे 10-12 कोटी रुपये आहे, अर्थातच महिन्याला ती 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमवते.

करीनाच्या कमाईचा मुख्य स्त्रोत म्हणजे तिचे चित्रपट. याशिवाय करीना अनेक प्रसिद्ध कंपन्यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून करोडो रुपये खर्च कमवते. इतकंच नाही तर विविध प्रकारच्या टीव्ही जाहिरातींमधूनही ती मोठी कमाई करते. मीडिया रिपोर्टनुसार करीना एका चित्रपटासाठी 10 कोटी रुपये ऐवढी तगडी फी घेते.

2012 मध्ये अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न झाल्यावर करीनाची जीवनशैली पूर्णपणे बदलली. करीना पती सैफच्या मुंबईतील वांद्रे येथे करोडोंच्या आलिशान घरात राहते. इतकेच नाही तर कधी-कधी करीना पतौडी पॅलेसमध्ये ती कॉलिटी टाईम घालवते. करीना आणि सैफला दोन मुलं आहेत.  तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान, अशी त्यांची नावे आहेत. 

करीना कपूरच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर तिच्याकडे बीएमडब्ल्यू 7 सीरिज, मर्सिडीज बेंज एस क्लास, ऑडी आर8, लेक्सस एलएक्स 470, लँड रोव्ह डिफेंडर आणि र रेंज रोव्हर वोग सारख्या लक्झरी कार आहेत. 

मोठ्या पडद्यानंतर, करीना कपूर OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. करिनाच्या वाढदिवशी म्हणजेच 21 सप्टेंबरला तिचा पहिला OTT चित्रपट 'जाने जान' OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात करीना कपूरशिवाय विजय वर्मा आणि जयदीप अहलावत यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: Kareena Kapoor Net Worth, Salary, House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.