इंडस्ट्रीतील लोकांनी कायम करिश्माला कमीपणा दाखवायचा प्रयत्न केला; करीनाने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 01:39 PM2024-03-05T13:39:56+5:302024-03-05T13:43:48+5:30

Kareena kapoor: करिश्माच्या स्ट्रगल काळाविषयी भाष्य करत करीनाने इंडस्ट्रीची काळी बाजू समोर आणली.

kareena-kapoor-once-revealed-said-she-has-seen karisma-kapoor-crying-during-her-struggle-days | इंडस्ट्रीतील लोकांनी कायम करिश्माला कमीपणा दाखवायचा प्रयत्न केला; करीनाने केला खुलासा

इंडस्ट्रीतील लोकांनी कायम करिश्माला कमीपणा दाखवायचा प्रयत्न केला; करीनाने केला खुलासा

बॉलिवूडच्या स्टार सिस्टर्स म्हणजे करीना कपूर आणि करिश्मा कपूर. या दोन्ही अभिनेत्रींनी त्यांच्या दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर इंडस्ट्री हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. परंतु, स्टार किड्स असूनही त्यांच्या वाट्याला स्ट्रगल हा आलाच. सध्या सोशल मीडियावर करीना कपूरची एक जुनी मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये तिने करिश्माला इंडस्ट्रीत कशा प्रकारे वागणूक दिली गेली. यावर भाष्य केलं आहे.

करीनाने सिमी ग्रेवाल यांना एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिने इंडस्ट्रीविषयी अनेक धक्कादायक खुलासे केले. यात करिश्माला इंडस्ट्रीत काही लोकांनी कशाप्रकारे मानसिक त्रास दिला हे तिने यावेळी सांगितलं. इतकंच नाही तर अनेकदा करिश्माने अनेक रात्री रडून काढल्या असंही ती म्हणाली.

नेमकं काय म्हणाली करीना?
 

"करिश्माला इंडस्ट्रीत खूप लोकांनी कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला. ती आईसोबत बसून तिला सगळं सांगायची. इंडस्ट्रीत तिच्याशी लोक कसं वागतात हे ती आईला सांगायची. मी लहान होते त्यामुळे माझ्यासमोर त्या काहीच बोलायच्या नाहीत. पण, मी चोरून त्यांचं बोलणं ऐकायचे. तिचं बोलणं ऐकून मला खूप त्रास व्हायचा. ती रात्र-रात्र रडत बसायची", असं करीना म्हणाली. यावर, करिश्माचा त्रास पाहून तू इंडस्ट्रीत येण्यापासून विचार केला होतास का? असा प्रश्न करीनाला विचारण्यात आला. 

"नाही. असं अजिबात झालं नाही. तिचा त्रास पाहूनच मी मोठी झाले. त्यामुळे मी प्रचंड स्ट्राँग झाले. सध्याच्या घडीला मी इतकी स्ट्राँग आहे की जगातली कोणतीही गोष्ट मी सहज हँडल करु शकेन. माझ्या आयुष्यात कितीही दु:ख, त्रास असो. कोणीही मला कितीही कमीपणा दाखवायचा प्रयत्न करु देत मी सगळ्यांना तोंड द्यायला समर्थ आहे. मी माझ्या आई आणि बहिणीला अशा संकटांना सामोरं जातांना पाहिलं आहे. त्यामुळे मी या सगळ्यासाठी आधीपासूनच तयार झाले आहे."

दरम्यान, करीनाने इंडस्ट्रीमध्ये तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. आजवरच्या कारकिर्दीत तिने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तर, करिश्मानेही उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य याच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंसं केलं. सध्या करिश्माचा कलाविश्वातील वावर कमी झाला असला तरी इंडस्ट्रीमधील पार्ट्या, अवॉर्ड फंक्शनमध्ये ती आवर्जुन हजेरी लावते.

Web Title: kareena-kapoor-once-revealed-said-she-has-seen karisma-kapoor-crying-during-her-struggle-days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.