मला वाईट वाटतं...; तैमूर-जहांगीर नावावरून मुलांना ट्रोल करण्यावर करिना कपूर बोलली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 03:00 PM2021-09-10T15:00:22+5:302021-09-10T15:00:42+5:30

धाकट्या लेकाच्या नावाचा खुलासा झाला आणि अनेकांनी करिनाला ट्रोल करायला सुरूवात केली. लोकांनी नको त्या कमेंट्स करत, सैफिनाला फैलावर घेतलं...

Kareena Kapoor Reacts On Being Trolled On Taimur And Jehangir Name | मला वाईट वाटतं...; तैमूर-जहांगीर नावावरून मुलांना ट्रोल करण्यावर करिना कपूर बोलली

मला वाईट वाटतं...; तैमूर-जहांगीर नावावरून मुलांना ट्रोल करण्यावर करिना कपूर बोलली

googlenewsNext
ठळक मुद्दे 2016 मध्ये करिनाने पहिल्या मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव तैमूरठेवल्याचं तिनं जाहिर करताच, अनेकांनी या नावावर आक्षेप घेतला होता. यावरून करिना व सैफ दोघंही प्रचंड ट्रोल झाले होते.

बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूरनं (Kareena Kapoor) काही महिन्यांपूर्वी दुस-या मुलाला जन्म दिला. आपल्या या मुलाचं नाव तिनं ‘जहांगीर’ ठेवलं. तिच्या या धाकट्या लेकाच्या नावाचा खुलासा झाला आणि अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. तिच्यासोबत सैफ अली खानही ट्रोल झाला. लोकांनी नको त्या कमेंट्स करत, सैफिनाला फैलावर घेतलं. आता करिनानं मुलांच्या नावावरून ट्रोल करणा-यांना उत्तरं दिलं आहे.

‘द गार्जियन’ला दिलेल्या मुलाखतीत बेबो यावर बोलली. ती म्हणाली, ‘प्रामाणिकपणं सांगते,आम्हाला आवडलीत आणि आम्ही आमच्या आवडीची नाव मुलांना दिलीत. यामागं दुसरा कोणताही विचार नव्हता. ही नाव खूप सुंदर आहेत आणि दोन्ही मुलं देखील सुंदर आहेत. पण नावावरून माझ्या मुलांना ट्रोल केलं गेलं. कोणी मुलांना कसं ट्रोल करू शकतं?  मला वाईट वाटतं पण मला माझ्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. मी माझं आयुष्य ट्रोलर्सनुसार जगत नाही.’

याआधी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीतही करिनानं यावर बोलली होती. ‘मी ट्रोलर्सच्या नकारात्मक प्रतिक्रियांकडे अजिबात लक्ष देत नाही. कारण मी एक पॉझिटीव्ह व्यक्ति आहे. कोरोना महामारीमुळे जगभर भयावह परिस्थिती आहेत. वातावरण आधीच नको इतकं नकारात्मक बनलं आहे. त्यामुळे मी अशा गोष्टींकडे सरळ सरळ दुर्लक्ष करते. आता माझ्याकडं एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे मेडिटेशन. मला लवकरात लवकर मेडिटेशन सुरू करावं लागेल. नकारात्मकता दूर पळवण्यासाठीचा हा उत्तम मार्ग आहे. लोक ज्यांच्याबद्दल बोलताहेत, ते दोन निरागस मुलं आहेत. आपल्याबद्दल कोण काय बोलतंय, हे त्यांना कळतंही नाही. अर्थात अशाही स्थितीत आम्ही आनंदी आणि सकारात्मक राहणार आहोत,’ असं करिना म्हणाली होती.

 2016 मध्ये करिनाने पहिल्या मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव तैमूरठेवल्याचं तिनं जाहिर करताच, अनेकांनी या नावावर आक्षेप घेतला होता. यावरून करिना व सैफ दोघंही प्रचंड ट्रोल झाले होते. तैमूर लंग चौदाव्या शतकाचा एक शासक होता ज्यानं तैमुरी घराण्याची स्थापना केली होती. तो खूप अत्याचारी आणि निर्दयी असल्याचे म्हटलं जातं. सैफिनाने अशा शासकाच्या नावावर आपल्या मुलाचं नाव ठेवावं, यावर लोकांचा आक्षेप होता. या वादानंतर सैफने एका क्षणाला तैमूर हे नाव बदलण्याचाही विचार केला होता. पण करिनाचा याला विरोध होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर करिना व सैफने आपल्या दुस-या मुलाचे नाव अधिकृतपणे जाहिर केलेलं नाही. 


  

Web Title: Kareena Kapoor Reacts On Being Trolled On Taimur And Jehangir Name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.