करिना कपूरने सांगितले सैफच्या या सवयीमुळे इंडस्ट्रीत आहेत आमचे खूपच कमी फ्रेंड्स
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 06:00 AM2019-12-26T06:00:00+5:302019-12-26T06:00:02+5:30
करिना आणि सैफला इंडस्ट्रीत खूपच कमी फ्रेंडस असल्याचे सिक्रेट द लव्ह लाफ लाईव्ह शोच्या दरम्यान करिनाने सगळ्यांना सांगितले.
करिनाचा गुड न्यूज हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबतच अक्षय कुमार, कियारा अडवाणी, दलजीत दोसांज यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सध्या या चित्रपटाची टीम करत आहे. करिनाने नुकतीच द लव्ह लाफ लाईव्ह शो मध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात करिनाने तिच्या खाजगी आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.
करिना आणि सैफला इंडस्ट्रीत खूपच कमी फ्रेंडस असल्याचे सिक्रेट या कार्यक्रमाच्या दरम्यान करिनाने सगळ्यांना सांगितले होते. एवढेच नव्हे तर यामागे एक खास कारण असल्याचे देखील तिने या कार्यक्रमाच्या दरम्यान सांगितले. तिने म्हटले की, सैफला फिल्मी पार्ट्यांना जायला आवडत नाही. एवढेच नव्हे तर तो कोणत्याही चित्रपटाच्या स्क्रिनिंगला जाणे देखील टाळतो. त्याला खोटे बोलायला आवडत नाही आणि त्याचमुळे तो अशा ठिकाणी जाणं टाळतो. त्याच्या याच स्वभावामुळे इंडस्ट्रीत आमचे खूपच कमी फ्रेंड्स आहेत.
गुड न्यूज या चित्रपटाचा विषय हा आजवरच्या बॉलिवूड चित्रपटांपेक्षा खूप वेगळा आहे. त्यामुळे या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासून या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सगळ्याच वयोगटातील लोकांमध्ये या चित्रपटाविषयी चर्चा रंगली असून केवळ शहरातील लोकांमध्येच नव्हे तर छोट्या छोट्या गावात देखील या चित्रपटाच्या ट्रेलरचीच चर्चा सुरू आहे.
दिग्दर्शक राज मेहता ‘गुड न्युज’ हा अत्यंत आगळ्यावेगळ्या विषयावरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहेत. आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने चित्रपटातील दोन्ही जोडपे अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करत असतात. पण, त्यात जो काही गोंधळ उडतो, त्यातून चित्रपटात धम्माल गमतीजमतींचा प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे कथानक हे अत्यंत मनोरंजक आणि गंमतीदार असे आहे. ‘गुड न्यूज’ हा अत्यंत कॉमेडी, रोमान्स आणि धम्माल गंमतीजमतींचा पॅकेज चित्रपट आहे. हा चित्रपट तुम्हाला एक फनी राईड घडवून आणेल यात काही शंका नाही.