करिना व सैफच्या व्हिडीओतील वॉचमॅनची नेटकऱ्यांना आली दया! म्हणाले, त्यालाही भावना आहेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 15:01 IST2021-04-23T15:01:14+5:302021-04-23T15:01:47+5:30
करिना कपूर आणि सैफ अली खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पण हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागचे कारण, सैफिना नाही तर व्हिडीओत दिसत असलेला वॉचमॅन आहे.

करिना व सैफच्या व्हिडीओतील वॉचमॅनची नेटकऱ्यांना आली दया! म्हणाले, त्यालाही भावना आहेत
करिना कपूर ( Kareena Kapoor) आणि सैफ अली खानचा (Saif Ali khan) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पण हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागचे कारण, सैफिना नाही तर व्हिडीओत दिसत असलेला वॉचमॅन आहे. या वॉचमॅनसाठी नेटकरी काहीसे भावुक झालेले दिसत आहेत.
तर शुक्रवारी सैफ व करिना क्लिनिकमध्ये पोहोचले. साहजिकच फोटोग्राफर्स आधीच हजर होते. करिना कारमधून उतरताच सर्व फोटोग्राफर्सचे कॅमेरे तिच्यावर रोखले गेलेत. करिनाचे फोटो क्लिक करणार, तोच वॉचमॅन मध्ये आला. फोटोग्राफर्सला हे आवडले नाही. अशात ‘अबे साइड हो ना वॉचमॅन यार ’ असे कुणीतरी मागून गर्दीतून ओरडला. नेमके हेच नेटक-यांना खटकले.
वॉचमॅन स्वत:ची ड्युटी बजावतोय, अशास्थितीत त्याच्यावर असे कोण ओरडू शकतो? असे एका युजरने लिहिले. अन्य एका युजरने फोटोग्राफर्सला वॉचमॅनचा आदर करण्याचा सल्ला दिला. वॉचमॅनला भावना नसतात का?, ती इतकी मोठी झाली का की तिच्यासाठी तुम्ही एका गरीब वॉचमॅनला अशा पद्धतीने बोलता? अशा शब्दांत एका युजरने आपला संताप व्यक्त केला.
महाराष्ट्रात कोरोनामुळे सध्या लॉकडाऊन सुरु आहे. मात्र अशाही परिस्थितीत सेलिब्रिटी फोटोग्राफर्स रस्त्यांवर आहेत. सेलिब्रिटींच्या मागे धावणा-या या फोटोग्राफर्सला घरात राहण्याचा सल्लाही काही युजर्सनी दिला आहे.
करिनाचे म्हणाल तर करिना क्लिनिकमध्ये कशासाठी गेली होती, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. काहीच महिन्यांपूर्वी करिना दुस-यांदा आई बनली आहे. दुस-या मुलाला जन्म दिल्यानंतर महिनाभरातच ती कामावर परतली आहे. करिनाचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. प्रेग्नंसीआधीच करिनाने या सिनेमाचे शूटींग संपवले होते.