हिंदू की मुस्लीम! नेमक्या कोणत्या पद्धतीने झालं करीना-सैफचं लग्न? बऱ्याच वर्षांनी चाहत्यांना मिळालं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 04:50 PM2024-03-30T16:50:58+5:302024-03-30T16:52:13+5:30
Kareena kapoor: सैफ आणि करीनाने रिसेप्शन पार्टीमध्ये पाण्यासारखा पैसा खर्च केला होता.
बॉलिवूडमधील पॉवर कपल म्हणून ओळखली जाणारी जोडी म्हणजे करीना कपूर (kareena kapoor) आणि सैफ अली खान (saif ali khan). धर्म, जात, वयातील अंतर ही सगळं बंधन मोडून या जोडीने २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे या दोघांनी लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. परंतु, त्याचं लग्न नेमकं कोणत्या पद्धतीने झालं हे अनेकांना ठावूक नाही.
करीना आणि सैफ या दोघांचेही धर्म वेगवेगळे आहेत. त्यामुळे नेमक्या कोणत्या धर्माच्या पद्धतीने या जोडीने लग्नगाठ बांधली असावी असा प्रश्न अनेकांना पडतो. परंतु, या जोडीने दोघांपैकी कोणत्याही एका धर्माचं पालन न करता लग्नगाठ बांधली आहे.
कोणत्या पद्धतीने झालं सैफ-करीनाचं लग्न?
करीना- सैफ या जोडीने निकाह किंवा लग्नगाठ बांधली नसून त्यांनी थेट कोर्ट मॅरेज केलं आहे. परंतु, लग्नानंतर या जोडीने रिसेप्शन पार्टी ठेवली होती. या पार्टीमध्ये कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले होते. त्यामुळे या पार्टीवर या जोडीने पाण्यासारखा पैसा खर्च केला.
दरम्यान, लग्नाच्या रिसेप्शन पार्टीसाठी करीनाने पतौडी खानदानाचा पारंपरिक शरारा परिधान केला होता. हा शरारा तब्बल १ कोटी रुपयांचा असल्याचं म्हटलं जातं. या जोडीच्या लग्नाला जवळपास १२ वर्षांपेक्षा जास्त काळ झाला असून त्यांना तैमूर आणि जहांगीर ही दोन मुलंदेखील आहेत.