करिना कपूर म्हणतेय, आई झाल्यानंतरही प्रेक्षकांनी मला स्वीकारावे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2017 09:12 AM2017-02-15T09:12:16+5:302017-02-15T14:42:16+5:30

आई झाल्यानंतर माझा लूक कसा असेल याविषयी मी चितेंत होती. परंतु मला असे वाटतेय की, माझ्या फॅन्स आणि प्रेक्षकांनी ...

Kareena Kapoor says, the audience should accept me even after my mother | करिना कपूर म्हणतेय, आई झाल्यानंतरही प्रेक्षकांनी मला स्वीकारावे

करिना कपूर म्हणतेय, आई झाल्यानंतरही प्रेक्षकांनी मला स्वीकारावे

googlenewsNext
झाल्यानंतर माझा लूक कसा असेल याविषयी मी चितेंत होती. परंतु मला असे वाटतेय की, माझ्या फॅन्स आणि प्रेक्षकांनी मला प्रत्येक रूपात स्वीकारायला हवे, असे मत अभिनेत्री करिना कपूर हिने व्यक्त केले. आहारतज्ज्ञ रजूता दिवेकर हिच्याशी फेसबुक चॅटवर बोलताना तिने ही अपेक्षा व्यक्त केली. 

यावेळी करिना म्हणाली की, प्रेग्ंनेसीनंतर काय करायला हवे हे मला माहीत नाही. परंतु मी खूप खूश आणि संतुष्ट असून, काम करीत असल्याचा आनंद होत आहे. मी दररोज अनेकांना भेटते, बोलते. तेही माझ्याशी तेवढ्याच आत्मियतेने बोलतात. त्यामुळे मला असे वाटतेय की, त्यांनी माझा स्वीकार केला असावा. प्रेक्षकांनीदेखील मला असेच स्वीकारायला हवे, असेही करिना म्हणाली. 

तब्बल नऊ महिने गर्भावस्थेत असल्याने मला असे वाटतेय की, या चार महिन्यांत माझ्या चहुबाजूची परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे मला परत पहिल्यासारख्या अवस्थेत परतण्यास नक्कीच वेळ लागेल. मी रजेताला ‘टशन’मधील माझ्या झिरो साइज लूकबद्दल सांगितले. मात्र ही प्रक्रिया लगेचच होणार नाही तर, त्यास वेळ लागेल, असेही करिना म्हणाली. 

गर्भावस्थेत असल्यापासून करिना त्याच्या वाढत्या वजनाची नियमित तपासणी करीत आली आहे. याविषयी ती नेहमीच सोशल मीडियावरही बोलताना बघावयास मिळाली आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात तिच्या वाढत्या वजनावर चर्चाही रंगली होती. यावेळी त्यालाही करिनाने उत्तर दिले. ती म्हणाली की, कोणी असं म्हणून कसं शकतेय की, माझे वजन वाढले आहे? मी नेहमीच माझ्या फिटनेसबाबत अलर्ट असते. रजेताने तिला आहाराचे वेळापत्रक दिले असून, त्याचे ती तंतोतंत पालन करीत असल्याचे समजते. 

Web Title: Kareena Kapoor says, the audience should accept me even after my mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.