22 वर्षानंतर करीनाने शेअर केला K3G मधला व्हिडीओ; स्वत:च्या भूमिकेविषयी पहिल्यांदाच मांडलं मत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 05:35 PM2023-12-14T17:35:34+5:302023-12-14T17:36:54+5:30
'कभी खुशी कभी गम' सिनेमाला २२ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने करीनाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन खास पोस्ट शेअर केली आहे.
'कभी खुशी कभी गम' हा बॉलिवूडमधील एव्हरग्रीन चित्रपटांपैकी एक आहे. २००१ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा आजही प्रेक्षकांचं पूरेपूर मनोरंजन करतो. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, काजोल, हृतिक रोशन, करीना कपूर,जया बच्चन अशी कलाकारांची फौज असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन करण जोहरने केलं होतं. या चित्रपटातील गाणीही प्रचंड हिट झाली होती. आज या सिनेमाला २२ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने करीनाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन खास पोस्ट शेअर केली आहे.
करीना 'कभी खुशी कभी गम' चित्रपटात काजोलच्या लहान बहिणीच्या भूमिकेत होती. या सिनेमात तिने पूजा शर्मा हे पात्र साकारलं होतं. तिने साकारलेली पूची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. पूची फॅशन आणि हॉटनेसने सगळ्यांनाच वेड लावलं होतं. आजही हे पात्र तितकंच लोकप्रिय आहे. K3Gमधील पूजा म्हणजेच पूचा व्हिडिओ करीनाने तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. या व्हिडिओला तिने "२२ वर्ष आणि आणखी मजबूत होत आहे," असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.
दरम्यान, करीना लवकरच 'सिंघम ३' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच तिने करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये हजेरी लावली होती. करीना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.