"लग्न, घटस्फोट, चिंता आणि..." करीना कपूरच्या 'त्या' क्रिप्टिक पोस्टमुळे चाहते चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 15:09 IST2025-02-09T15:08:33+5:302025-02-09T15:09:20+5:30
करीना कपूरनं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.

"लग्न, घटस्फोट, चिंता आणि..." करीना कपूरच्या 'त्या' क्रिप्टिक पोस्टमुळे चाहते चिंतेत
Kareena Kapoor: अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेत्री करीना कपूर (kareena kapoor) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सैफ अली खानवर हल्ला (Saif Ali Khan Attack) झाला. यानंतर बसलेला मानसिक धक्का, रुग्णालयात धावपळ आणि पोलिस चौकशी अशा बऱ्याच कठीण परिस्थितींचा या जोडप्यानं सामना केलाय. सध्या सैफ आणि करीना घडलेल्या घटनेतून सावरत आहेत. अशातच आता करीनाची पोस्ट चर्चेत आली आहे.
करीना कपूरनं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये लिहलेलं आहे की, "लग्न, घटस्फोट, चिंता, बाळंतपण, एखाद्या आपल्या व्यक्तीला गमावणं, पालकत्व हे तुम्हाला कळणार नाही. जोपर्यंत वास्तवात या गोष्टी तुमच्याबरोबर घडत नाहीत. आयुष्यातील परिस्थिती आणि सिद्धांत हे कधीच समजणार नाहीत. तुम्हाला वाटतं असेल, तुम्ही दुसऱ्यापेक्षा अधिक हुशार आहात. पण, जोपर्यंत आयुष्यात तुमच्यावर ती वेळ येत नाही आणि तुम्हाला नम्र बनवत नाही तोपर्यंत हे वाटतं राहिलं". करीनाची ही पोस्ट व्हायरल होताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. सर्व काही ठीक आहे ना? असंही अनेकांनी विचारलं आहे.
करीना कपूरच्या चाहत्यांची संख्या भारतातचं नाही तर, परदेशात देखील फार मोठी आहे. दोन मुलांची आई असूनही करीना मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे. तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आजही तितकेच उत्सुक असतात. करिना कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, करीना कपूर शेवटची 'सिंघम अगेन' सिनेमात दिसली होती. त्याआधी ती हंसल मेहता दिग्दर्शित 'द बकिंघम मर्डर्स' चित्रपटात पाहायला मिळाली होती.