Promo : सिनेमा सोडून करिना कपूरचा छोट्या पडद्यावर डेब्यू? जाणून घ्या हे खरं की खोटं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 01:04 PM2022-02-20T13:04:21+5:302022-02-20T13:05:58+5:30

Spy Bahu : करिना कपूर ही बॉलिवूडची लोकप्रिय व महागडी अभिनेत्री आहे. हीच करिना कपूर आता टीव्ही सीरिअलमध्ये दिसणार आहे. आश्चर्य वाटलं ना?

kareena kapoor shoots narration promo for tv show spy bahu ON Colors TV | Promo : सिनेमा सोडून करिना कपूरचा छोट्या पडद्यावर डेब्यू? जाणून घ्या हे खरं की खोटं? 

Promo : सिनेमा सोडून करिना कपूरचा छोट्या पडद्यावर डेब्यू? जाणून घ्या हे खरं की खोटं? 

googlenewsNext

Kareena Kapoor Spy Bahu Tv Serial: करिना कपूर (Kareena Kapoor) ही बॉलिवूडची लोकप्रिय व महागडी अभिनेत्री आहे. हीच करिना कपूर आता टीव्ही सीरिअलमध्ये दिसणार आहे. आश्चर्य वाटलं ना? हे खरं आहे पण काही अंशी खरं आहे. होय, बेबो लवकरच ‘स्पाय बहू’ (Spy Bahu)या टीव्ही शोमधून छोट्या पडद्यावर डेब्यू करतेय. पण अ‍ॅक्टिंग नाही तर या मालिकेत ती एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत असणार आहे. याआधी ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेत अभिनेत्री रेखा नॅरेटरच्या भूमिकेत दिसली होती. अगदी तशीच बेबोची भूमिका असणार आहे.

कलर्स टीव्ही ( Colors TV ) लवकरच एक प्रेमकहाणी घेऊन येतेय. यात करिना कपूर सूत्रधाराची अर्थात नरेटरची भूमिका साकारताना दिसणार आहे. याचा अर्थ मालिकेत करिना अ‍ॅक्टिंग करताना दिसणार नाही. ती फक्त शो नरेट करेल. या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे.

प्रोमोत करिना ऑरेंज ड्रेसमध्ये दिसतेय आणि सीरिअलची कथा सांगतेय. ‘दुनिया की हर लव्ह स्टोरी की शुरूवात ऐसे ही होती है. लडका लडकी मिलते है, जैसे सेजल और योहान और इश्क के समंदर में मीलों तक तैरते है. लेकिन हर प्यार में छुपे होते हैं कुछ राज. इन मुश्किलों में कैसे होगी पूरी, एक स्पाई की लव्ह स्टोरी,’ असं करिना प्रोमोमध्ये म्हणताना दिसते.

मालिकेचा प्रोमो पाहून यात करिनाही दिसणार, असा गैरसमज होऊ नये म्हणून प्रोमोसोबत मेकर्सनी डिस्क्लेमरही दिला आहे. करिना शोमध्ये नरेटर म्हणून दिसणार आहे, हे त्यात स्पष्ट केलं आहे. कलर्सवर सुरू होणाऱ्या या नव्या मालिकेत सना सैय्यद व सेहबाज आजीम मुख्य भूमिकेत आहे. मालिकेची कथा एका महिला गुप्तहेराची आणि एका संदिग्ध अतिरेक्याच्या अवतीभवती फिरताना दिसणार आहे.

Web Title: kareena kapoor shoots narration promo for tv show spy bahu ON Colors TV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.