​करिना कपूरला करायचेयं, एकूण १९ किलो वजन कमी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2017 10:10 AM2017-06-04T10:10:17+5:302017-06-04T15:40:17+5:30

सध्या करिना कपूर खान एकाच कामात बिझी आहे. होय, अलीकडे करिना कायम जिम अन् तिच्या योग्या क्लासेसच्या बाहेर दिसतेय. ...

Kareena Kapoor, a total of 19 kg weight loss! | ​करिना कपूरला करायचेयं, एकूण १९ किलो वजन कमी!

​करिना कपूरला करायचेयं, एकूण १९ किलो वजन कमी!

googlenewsNext
्या करिना कपूर खान एकाच कामात बिझी आहे. होय, अलीकडे करिना कायम जिम अन् तिच्या योग्या क्लासेसच्या बाहेर दिसतेय. म्हणजेच, करिना वजन कमी करण्याच्या मागे लागलीय. करिनाने फिटनेस आणि फिगर याबाबतीत कुठलीही तडजोड केलेली नाही. मुलगा तैमूरच्या जन्मानंतर करिनाचे वजन खूप वाढले होते. पण तैमूरचा जन्मानंतर महिनाभरानेच करिना वाढलेले वजन कमी करण्याच्या कामी लागली. डिसेंबरमध्ये करिनाने बाळाला जन्म दिला आणि पुढच्या १२ आठवड्यांनी तिने वर्कआऊट सुरु केले. 



गेल्या तीन महिन्यांपासून करिना जिममध्ये प्रचंड मेहनत करतेय. ती कडक डाएटवर आहे. प्रेग्नंसीदरम्यान करिनाचे १८ किलो वजन वाढले होते. गत तीन महिन्यांत करिनाने १६ किलो वजन कमी केले आहे. पण इतके पुरेसे नाहीच मुळी. करिनाला एकूण १९ किलो वजन कमी करायचेयं. लवकरच करिना ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाचे शूटींग सुरु करणार आहे. त्यापूर्वी करिनाने १९ किलो वजन कमी करण्याचे टार्गेट ठेवले आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे, करिना तिचे हे टार्गेट नक्की पूर्ण करणार.
‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात करिनासोबत सोनम कपूर आणि स्वरा भास्कर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट एकता कपूर आणि रेहा कपूर एकत्र प्रोड्यूस करणार आहेत.   करिना लवकरच तिचा बेस्ट फ्रेण्ड करण जोहर याच्यासोबत एका रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपटात झळकणार आहे,अशीही खबर आहे. एकंदर काय, तर करिना पुन्हा तिच्या ग्लॅमरस अवतारात आपल्याला पाहायला मिळणार आहे. करिनाच्या चाहत्यांसाठी यापेक्षा दुसरी आनंदाची बाब कुठली बरी असू शकेल.

Web Title: Kareena Kapoor, a total of 19 kg weight loss!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.