पब्लिकला नाही आधी तुझ्या सेलिब्रिटी दोस्तांना सांग...! करिना कपूरला नेटकऱ्यांनी दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 02:35 PM2021-04-29T14:35:46+5:302021-04-29T14:39:49+5:30

तुम्ही सर्व जबाबदार आहात....!! करिना नियम मोडणा-यांवर संतापली अन् नेटकऱ्यांच्या निशाणावर आली...

kareena kapoor trolled for share post of awareness amid coronavirus pandemic- | पब्लिकला नाही आधी तुझ्या सेलिब्रिटी दोस्तांना सांग...! करिना कपूरला नेटकऱ्यांनी दिला सल्ला

पब्लिकला नाही आधी तुझ्या सेलिब्रिटी दोस्तांना सांग...! करिना कपूरला नेटकऱ्यांनी दिला सल्ला

googlenewsNext
ठळक मुद्दे इन्स्टाग्रामवर उतारे लिहिण्यापेक्षा जरा देशवासियांना मदत कर, असा सल्ला एका युजरने तिला दिला. एकंदर काय तर मास्क लावण्याचा सल्ला बेबोवरच उलटला.

त्सुनामी बनून आलेली कोरोनाची दुसरी लाट भयंकर ठरली. या लाटेने लोकांना हतबल करून सोडले. देशात ठिकठिकाणी सध्या कोरोनाचे थैमान आहे. अशात मास्क लावा, सतत हात धुवा, सॅनिटायझर वापरा, असे आवाहन सरकार व सेलिब्रिटींकडून करण्यात येत आहे. आता करिना कपूरनेही (Kareena Kapoor) मास्क लावण्याचे आवाहन केले. इतकेच नाही तर योग्य पद्धतीने मास्क न लावणा-यांना तिने फैलावर घेतले आहे. मात्र लोकांना असे फैलावर घेणे, तिच्यावरच उलटले. लोकांनी यानंतर करिनाला नको ते सुनावले.
बेबोने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये मास्क निष्काळजीपणे वापरणा-यांवर ती चांगलीच बरसली.  (Kareena Kapoor trolled for share post of awareness amid coronavirus pandemic-)

‘लोक इतके निष्काळजीपणे कसे वागू शकतात, हेच मला कळत नाही. देशात इतकी भीषण स्थिती असताना, हे असे कसे वागू शकतात? घराबाहेर पडताना योग्य पद्धतीने मास्क लावणे गरजेच आहे. पण अनेकजण चुकीच्या पद्धतीने मास्क लावतात. एकदा आपल्या डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफबद्दल विचार करा. ते मानसिक व शारिरीकदृष्ट्या कोलमड्याच्या स्थितीत आहेत. हे वाचणारा प्रत्येकजण कोरोना चेन ब्रेक करण्यासाठी जबाबदार आहे. आता देशाला तुमची खरी गरज आहे,’ असे करिनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले.

अन् लोक भडकले
करिनाची ही पोस्ट पाहताच नेटकरी भडकले. त्यांनी बेबोला चांगलेच सुनावले. सामान्य लोकांना सांगणे सोपे आहे. जरा तुझ्या सेलिब्रिटी मित्रांनाही सांग, जे इतक्या कठीण काळात मालदीवमध्ये सुट्टीला गेलेत, असे एका युजरने करिनाला सुनावले़.

अन्य एका युजरनेही करिनाला हाच सल्ला दिला. तुझा चुलत भाऊ आठवड्यापूर्वीच गर्लफ्रेन्डसोबत मालदीवमध्ये फिरून आला, प्लीज त्याला सांगतेस का? असे या युजरने लिहिले़.

गर्लगँगसोबत पार्टी करताना तुला हे शहाणपण सुचले नाही का? असे एका युजरने लिहिले. इन्स्टाग्रामवर उतारे लिहिण्यापेक्षा जरा देशवासियांना मदत कर, असा सल्ला एका युजरने तिला दिला. एकंदर काय तर मास्क लावण्याचा सल्ला बेबोवरच उलटला.

Web Title: kareena kapoor trolled for share post of awareness amid coronavirus pandemic-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.