करिना कपूरच्या लहान मुलाचा फोटो व्हायरल! हुबेहुब दिसतो मोठ्या भावासारखा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 02:28 PM2021-07-15T14:28:39+5:302021-07-15T14:29:17+5:30

करिना कपूरच्या फॅनपेजवर दोन फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये करिना तिच्या मुलांसोबत खेळताना दिसतेय.

kareena kapoor unseen photos with son jeh and taimur leaked viral | करिना कपूरच्या लहान मुलाचा फोटो व्हायरल! हुबेहुब दिसतो मोठ्या भावासारखा

करिना कपूरच्या लहान मुलाचा फोटो व्हायरल! हुबेहुब दिसतो मोठ्या भावासारखा

googlenewsNext
ठळक मुद्देअभिनेत्री करीना कपूर खान काही महिन्यांपूर्वीच दुस-यांदा आई झाली आणि यानंतर काही दिवसांतच बेबोचे गरोदरपणावर लिहिलेलं पुस्तक प्रकाशित झालं.

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान (Kareena Kapoor ) हिनं आठवडारापूर्वीच तिचं प्रेग्नंसीवर लिहिलेलं ‘करिना कपूर खान्स प्रेग्नंसी बायबल’ नावाचं पुस्तक प्रकाशित केले. तूर्तास तिचं हे पुस्तक वादाच्या भोव-यात सापडलं आहे. पण या पुस्तकाच्या निमित्तानं करिना कपूरचा दुसरा मुलगा जेह याचा पहिला फोटो समोर आला आहे. करिनाच्या एका फॅनपेजवर जेहचा फोटो शेअर केला गेला आहे.  (Kareena Kapoor unseen photos with son Jeh and Taimur )

करिना कपूरच्या फॅनपेजवर दोन फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये करिना तिच्या मुलांसोबत खेळताना दिसतेय.

पहिल्या फोटोत करिनासोबत तैमूर असल्याचा दावा केला जातोय. या फोटोत तैमूरच्या हातात पुस्तक आहे आणि तो करिनाच्या कुशीत बसला आहे. दुस-या फोटोत जेह असल्याचा दावा केला जातोय. या फोटोत करिना आपल्या तान्हुल्याच्या माथ्याचं चुंबन घेताना दिसतेय.
हा दावा खरा असेल आणि करिनासोबत जेह असेल तर तो अगदी आपल्या मोठ्या भावासारखा दिसतो, असंच म्हणावं लागेल. जेहचा फोटो समोर येताच चाहत्यांच्या एकापेक्षा एक भारी कमेंट्सही वाचायला मिळतं आहेत.

करिनानं याआधी जेहचे दोन फोटो शेअर केले होते. पण यात बाळाचा चेहरा दिसू दिला नव्हता. बाळाच्या नावाचा खुलासाही अगदी अलीकडे झाला आहे. आत्तापर्यंत त्याचं नावंही तिनं जगापासून लपवून ठेवलं होतं.
करिनासोबत तिच्या दोन्ही मुलांचा हा फोटो तिच्या पुस्तकात पाहायला मिळणार असल्याचा दावाही केला जातोय. या पुस्तकात मुलांसोबतचे तिचे अनेक अनसीन फोटो असतील, असं म्हटलं जातंय.
अभिनेत्री करीना कपूर खान काही महिन्यांपूर्वीच दुस-यांदा आई झाली आणि यानंतर काही दिवसांतच बेबोचे गरोदरपणावर लिहिलेलं पुस्तक प्रकाशित झालं. खुद्द करिनाने या पुस्तकाची माहिती सोशल मीडियावर शेर केली होती. हे पुस्तक म्हणजे माझं तिसरं मुलं असल्याचंही ती म्हणाली होती. पण आता या पुस्तकामुळं करिनाविरोधात बीडमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.  ‘करिना कपूर खान्स प्रेग्नंसी बायबल’या पुस्तकाच्या नावातील ‘बायबल’ या शब्दावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे.
 
  
 

Web Title: kareena kapoor unseen photos with son jeh and taimur leaked viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.