करिनाचा ‘ले पंगा’ अॅटिट्यूड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2016 02:40 PM2016-06-29T14:40:52+5:302016-06-30T16:03:22+5:30
कपूर घराण्यातील अभिनेत्री म्हणून सहाजिकच करिना कपूरमध्ये इंडस्ट्रीमध्ये येण्या आगोदरपासूनच ‘स्टारपण’ होते. करिश्माची लहान बहीण म्हणून तिच्या पदार्पणाची जोरदार ...
क ूर घराण्यातील अभिनेत्री म्हणून सहाजिकच करिना कपूरमध्ये इंडस्ट्रीमध्ये येण्या आगोदरपासूनच ‘स्टारपण’ होते.
करिश्माची लहान बहीण म्हणून तिच्या पदार्पणाची जोरदार चर्चादेखील झाली. ‘रेफ्युजी’पासून सुरू झालेला तिचा प्रवास आता ‘ए-लिस्ट’ अभिनेत्री होण्यापर्यंत येऊन पोहचला आहे.
पण या दरम्यान करिना सतत चर्चेत राहिली ती तिच्या इतर अॅक्ट्रेसेसबरोबर होणाºया ‘पंग्या’मुळे. ‘बेबो’चे इंडस्ट्रीमध्ये फार कमी लोकांसोबत माधुर्याचे संबंध आहेत.
येनकेन प्रकारे तिचे इतरांशी खटके उडत असतात. विशेष म्हणजे दुसऱ्या हीरोईन्सबद्दल तिला काय वाटते हे ती न कचरता खुलेआम बोलून दाखवते . तिच्या अशाच ‘ले पंगा’ अॅटिट्यूडची ही काही उदाहरणे आहेत.
प्रियंका चोपडा
कालपरवाच करिनाने प्रियंकाच्या हॉलीवूडमधील यशाला कमी लेखत म्हटले की, माझ्यासाठी माझे कुटुंब महत्त्वाचे आहे. त्यांना सोडून मी विदेशात सेटल नाही होऊ शकत. प्रियंकाबाबत तिला असलेली जेलसी ही काही नवीन नाही. बेबो आणि देसी गर्ल कधीच एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी नव्हत्या.
‘ऐतराज’मध्ये दोघींनी एकत्र काम केले तेव्हा सेटवर दोघींमध्ये नेहमी ‘कॅटफाईट’ चालायची. करण जोहरच्या चॅट शोवर तर तिने प्रियंकाच्या अॅक्सेंटची खिल्ली उडवताना म्हटले होते की, तिला कुठून असा अॅक्सेंट मिळाला? यावर प्रियंकानेदेखील तिला खरमरीत उत्तर दिले होत- जिथून करिनाचा बॉयफ्रेंड सैफला अॅक्सेंट मिळाला तेथूनच! आता बोला.
अमिषा पटेल
हृतिक सोबत ‘कहो ना प्यार है’मधून करिना पदार्पण करणार होती. मात्र त्यावेळी तिने अमिताभचा मुलगा अभिषेक जास्त हीट होईल म्हणून ‘रेफ्युजी’ स्वीकारला. पण झाले उलटेच! तेव्हापासून करिनाला अमिषा पटेलविषयी तिटकारा आहे. तिने तसा तो वेळोवेळी विविध मुलाखतींमधून बोलूनदेखील दाखवला आहे.
२००१मध्ये ती म्हणाली होती की, अमिषाला मोठा गैरसमज आहे की, ती माझ्यापेक्षा मोठी स्टार आहे. अमिताभ, शाहरुख यांच्याबरोबरच काम केलेले आहे. तिच्यामुळे मला असुरक्षितता वाटण्याचा तर प्रश्नच नाही. आजतयागत या दोघींमध्ये मैत्री होऊ शकलेली नाही.
ऐश्वर्या राय-बच्चन
संजय लीला भंसाळीने ‘देवदास’मध्ये पारोच्या रोलसाठी करिनाला आॅफर दिली होती. मात्र अचानक तिच्या जागी ऐश्वर्या रायला निवडल्याने करिना चांगलीच बिथरली. तिचे म्हणने होते की, ऐश्वर्याने तिचा रोल हिसकावून घेतला. ऐश तर तिची दुश्मनच झाली.
नंतर अभिषेकसोबत करिश्माचे होणारे लग्न तुटले आणि ऐश्वर्याशी त्याने लग्न केले. त्यामुळे तर करिनाचा ऐशबद्दलचा राग आणखीच वाढला. भंसाळीलादेखील तिने ‘दुय्यम’ दर्जाचा दिग्दर्शक म्हणून हिणवले होते.
प्रीती झिंटा
करण जोहरने ‘कल हो ना हो’चा प्रथम करिनाला प्रस्ताव दिला होता. मात्र, आपल्या ‘स्टारडम’च्या हवेत तिने अधिक पैसे मागितल्यामुळे करणने प्रीती झिंटाला कास्ट केले. चित्रपट हीट ठरला आणि करिनाच्या हातून आणखी एक सशक्त रोल गेला.
हाच राग मनात ठेवून करिना प्रीतीबद्दल कधीच चांगले बोलत नाही. करण जोहरशीदेखील तिने बराच काळ यामुळे अबोला धरला होता. करणशी तर तिने पॅच-अप केले; प्रीतीसोबत अजुनही वैर आहे.
बिपाशा बसू
करिनाचे सर्वात कुप्रसिद्ध भांडण म्हणजे बिपाशासोबत ‘अजनबी’ चित्रपटाच्या सेटवर झालेला वाद. करिनाने बिपाशाला तिच्या रंगावरून अपशब्द वापले होते. सर्वांसमोर तिने बिपाशाला ‘काली बिल्ली’ म्हणून संबोधले होते. एवढेच नाही तर तिचा बॉयफ्रेंड जॉन अब्राहमलादेखील करिनाने सोडले नाही.
२००७ साली ‘कॉफी वुईथ करण’वर ती म्हणाली होती की, जॉनच्या चेहºयावर कसल्याच प्रकारचे ‘एक्सप्रेशन्स’ दिसत नाही. त्याने अभिनयाचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. आऊच!