करिनाला मुलगा हवा की मुलगी?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2016 02:44 PM2016-09-12T14:44:02+5:302016-09-12T20:24:28+5:30
करिना कपूर खान आई होणार आहे, हे तुम्हा सर्वांना ठाऊक आहेच. प्रेग्नंसीमध्ये आणि प्रेग्नंसीनंतर करिना काम करणार की नाही, ...
क िना कपूर खान आई होणार आहे, हे तुम्हा सर्वांना ठाऊक आहेच. प्रेग्नंसीमध्ये आणि प्रेग्नंसीनंतर करिना काम करणार की नाही, यावरून बरीच चर्चा रंगली. यावर मी प्रेग्नंसीतही आणि प्रेग्नंसीनंतरही काम करणार. कारण माझ्या कामावर माझे नितांत प्रेम आहे, असे करिनाने स्पष्ट केले. आता चर्चा रंगलीय ती करिनाला मुलगा होणार की मुलगी याची. मध्यंतरी मिस्टर अॅण्ड मिसेस खान यांना मुलगाच हवा, अशी बातमी कानावर आली. पण मि. अॅण्ड मिसेस खान यांनी ही बातमी धुडकावून लावली. पण आता करिनाला मुलगा होणार की मुलगी ही उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. या उत्सूकतेतून स्वत: करिनाला मुलगा हवा की मुलगी हा नवा प्रश्नही जन्मास आला. नेमका हा प्रश्न करिनाला विचारण्यात आला. यावर करिनाने अतिशय सुंदर उत्तर दिले. मी मुलगी आहे आणि मुलगी झाल्यास मला आनंदच होईल, असे करिना म्हणाली. सो स्वीट ना!