करिनाने चाखली चटपटीत पदार्थांची लज्जत...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2016 05:46 PM2016-11-22T17:46:50+5:302016-11-22T17:46:50+5:30
गरोदरपणात अनेक खमंग, चटपटीत पदार्थ खावेसे वाटतात हे खरंय? पण, ‘बी टाऊन’च्या अभिनेत्रींना या समजुतीचा काही फरक पडत नाही. ...
ग ोदरपणात अनेक खमंग, चटपटीत पदार्थ खावेसे वाटतात हे खरंय? पण, ‘बी टाऊन’च्या अभिनेत्रींना या समजुतीचा काही फरक पडत नाही. त्या गरोदरपणातही त्यांचे डाएट फॉलो करताना दिसतात. पण, बॉलिवूडची ‘बिनधास्त गर्ल ’ करिना कपूर खान मात्र डाएटला बाजूला सारून मस्तपैकी आवडीच्या पदार्थांवर ताव मारताना दिसतेय. तिला आवडणारे पदार्थ समोर दिसले की मग तिच्या तोंडाला पाणी सुटते. यावर विश्वास बसत नाही ना? मग वाचा.. बेबो एका इव्हेंटला गेली असता तिला अचानक तिच्या आवडीचे तेलकट पदार्थ खाण्याची इच्छा झाली. त्या इच्छेला ती कंट्रोल करू शकली नाही. मग तिने त्या पदार्थांची आॅर्डर दिली. एक टीनेच तिने ते संपूर्ण पदार्थ फस्त केले.
पती सैफ अली खान तिला तिच्या अशा वागण्यामुळे नेहमी बोलत असतो. मात्र, ऐकली तर ती बेबो कसली नाही का? सैफलाही वेगवेगळे चटपटीत पदार्थ खायला प्रचंड आवडतात. त्यामुळे तो ही तिला हवे ते पदार्थ खाण्याची परवानगी देतो आहे. तिच्या खाण्यापिण्याला विरोध न करता तो देखील तिच्यासोबत चांगल्या पतीचे कर्तव्य निभावताना दिसतोय.
‘वीरें दी वेडिंग’ चित्रपटाची शूटिंगअगोदरच सैफीनाने चाहत्यांना छोटा नवाब येणार असल्याची गोड बातमी दिली. सुरूवातीचे काही महिने बेबोने चित्रपटाचे शूटिंग केले. तिने तिची भूमिका पूर्णपणे साकारली आणि मगच ती मातृत्व रजेवर गेली. प्रसूतीनंतरही ती फार दिवस घरी बसणार नसून लगेचच चित्रपट स्विकारणार असल्याचे तिने सांगितले आहे.