'हम साथ साथ है' मधील सुपरहिट गाण्यावर थिरकली करिश्मा कपूर; इंडियन आयडॉलच्या मंचावर लगावले ठुमके

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 13:45 IST2025-02-08T13:40:18+5:302025-02-08T13:45:21+5:30

अभिनेत्री करिश्मा कपूरचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल.

karishma kapoor dance on superhit song from hum saath saath hai performed on the stage of indian idol season 15 video viral | 'हम साथ साथ है' मधील सुपरहिट गाण्यावर थिरकली करिश्मा कपूर; इंडियन आयडॉलच्या मंचावर लगावले ठुमके

'हम साथ साथ है' मधील सुपरहिट गाण्यावर थिरकली करिश्मा कपूर; इंडियन आयडॉलच्या मंचावर लगावले ठुमके

Karishma Kapoor: १९९९ मध्ये 'हम साथ साथ है' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. सूरज बडजात्या यांनी हा चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. सलमान खान, तब्बू, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, करिश्मा कपूर, रीमा लागू, नीलम कोठारी (Neelam Kothari), अलोक नाथ असे अनेक दिग्गज कलाकारांची फळी चित्रपटात पाहायला मिळाली. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळपास २५ वर्षे उलटली. दरम्यान, या चित्रपटाप्रमाणे त्यातील गाणी सुद्धा प्रचंड गाजली. 'हम साथ साथ है' मधील 'म्हारे हिवडा में नाचे मोर' हे गाणं आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता पुन्हा एकदा या गाण्याची चर्चा होताना दिसते आहे. याचं कारण म्हणजे या सुपरहिट गाण्यावर करिश्मा कपूरचा (Karishma Kapoor) डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.


नुकतीच करिश्मा कपूरने 'इंडियन आयडॉल-१५' च्या मंचावर हजेरी लावली. त्यादरम्यान, अभिनेत्रीने 'म्हारे हिवडा में नाचे मोर' या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. हा व्हिडीओ करिश्मा कपूरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. "सपना मोड ऑन...", असं कॅप्शन देत अभिनेत्रीने तिचा हा सुंदर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्याचा पाहायला मिळतोय. करिश्माचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी अंकिताचं कौतुकही केलं आहे. 

'हम साथ साथ है' हा मल्टिस्टारर हा चित्रपट आजही प्रेक्षक आवडीने पाहतात. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तब्बल ८० कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट एका कौटुंबिक कथेवर आधारित होता. 

Web Title: karishma kapoor dance on superhit song from hum saath saath hai performed on the stage of indian idol season 15 video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.