गोविंदाच्या 'राजा बाबू' सिनेमासाठी करिश्मा कपूर नव्हती पहिली पसंती, या माजी मिस इंडियाची केली होती निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 05:30 PM2024-08-07T17:30:32+5:302024-08-07T17:31:13+5:30

Raja Babu Movie : गोविंदाच्या करिअरमध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे अप्रतिम आहेत. असाच एक चित्रपट म्हणजे राजा बाबू. १९९४चा हा सुपरहिट चित्रपट डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केला होता.

Karishma Kapoor was not the first choice for Govinda's 'Raja Babu', the former Miss India was chosen. | गोविंदाच्या 'राजा बाबू' सिनेमासाठी करिश्मा कपूर नव्हती पहिली पसंती, या माजी मिस इंडियाची केली होती निवड

गोविंदाच्या 'राजा बाबू' सिनेमासाठी करिश्मा कपूर नव्हती पहिली पसंती, या माजी मिस इंडियाची केली होती निवड

गोविंदा(Govinda)च्या करिअरमध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे अप्रतिम आहेत. असाच एक चित्रपट म्हणजे राजा बाबू (Raja Babu Movie). १९९४चा हा सुपरहिट चित्रपट डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केला होता. गोविंदा, करिश्मा कपूर, शक्ती कपूर, कादर खान, अरुण इराणी, प्रेम चोप्रा आणि गुलशन ग्रोव्हर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात कॉमेडीच्या सोबतच ड्रामा होता. या चित्रपटात राजा बाबूच्या मधुबाला म्हणजेच करिश्मा कपूर (Karishma Kapoor)ची भूमिका पहिल्यांदा एका माजी मिस इंडियाला ऑफर करण्यात आली होती. मात्र तिने ही भूमिका नाकारली.

राजा बाबूसाठी डेविड धवनची पहिली पसंती माजी मिस इंडिया आणि बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाला होती. मात्र जुही चावलाने हा चित्रपट नाकारला. तिला चित्रपटाची कथा अजिबात आवडली नाही. त्यामुळे तिने या चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे हा चित्रपट करिश्मा कपूरकडे गेला आणि तिची गोविंदासोबतची जोडी नंबर वन ठरली.

या अभिनेत्याला नंदूची भूमिका झाली होती ऑफर 
गोविंदाचा राजा बाबू हा साऊथच्या एका प्रसिद्ध चित्रपटापासून प्रेरित होता. १९९२ साली रिलीज झालेला तामिळ चित्रपट रासुकुट्टीचा रिमेक होता. एवढेच नाही तर या चित्रपटातील शक्ती कपूरची भूमिका सर्वप्रथम सतीश कौशिक यांना ऑफर करण्यात आली होती. पण शक्ती कपूर यांची निवड झाली. राजा बाबूचे नंदू सबका बंधू आणि समझता नहीं है यार हे डायलॉग खूप गाजले. हे संवाद गोविंदाने सेटवर तयार केले होते. राजा बाबूचे बजेट सुमारे ३.२६ कोटी रुपये होते तर बॉक्स ऑफिसवर १५.२६ कोटी रुपये कमावले होते. अशा प्रकारे हा वर्षातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक होता.

Web Title: Karishma Kapoor was not the first choice for Govinda's 'Raja Babu', the former Miss India was chosen.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.