मुलांसोबत व्हेकेशन एन्जॉय करतोय करिष्मा कपूरचा पूर्व पती; फोटो केले शेअर!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 01:40 PM2018-03-23T13:40:59+5:302018-03-23T19:10:59+5:30
आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये एकेकाळी सर्वोच्च स्थान मिळविणारी अभिनेत्री करिश्मा कपूर लग्नानंतर पडद्यावरून गायब झाली आहे. त्यानंतर ती तिच्या फिल्मी ...
आ ल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये एकेकाळी सर्वोच्च स्थान मिळविणारी अभिनेत्री करिश्मा कपूर लग्नानंतर पडद्यावरून गायब झाली आहे. त्यानंतर ती तिच्या फिल्मी लाइफपेक्षा पतीसोबतच्या वादामुळेच अधिक चर्चेत राहायची. अखेर तिने पती संजय कपूरसोबत घटस्फोट घेऊन विभक्त होणे पसंत केले. संजय आणि करिश्माला समायरा नावाची मुलगी आणि कियान नावाचा मुलगा आहे. हे दोन्ही मुली मम्मी करिश्माकडेच राहतात. परंतु मुलांप्रती संजयच्या मनातील प्रेम तसूभरही कमी झाले नाही. नुकतेच काही फोटोज् समोर आले असून, त्यामध्ये संजय समायरा आणि कियानसोबत स्किइंग करताना बघावयास मिळत आहे.
संजयने सोशल मीडियावर मुलांसोबतचे हे फोटो शेअर केले असून, त्याच्या कॅप्शनमध्ये 'Spent the weekend skiing with my kids. The older the grow the more I learn from their experiences. Blessed to have the opportunity to parent them! Every moment counts! Great conversations, outstanding ski conditions, and just pure quality time!
असे लिहिले आहे. काही काळापूर्वी करिश्माने मुलगी समायराच्या वाढदिवसानिमित्त एका शानदार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत करिश्माचा पूर्व पती संजयही सहभागी झाला होता. संजय सध्या त्याच्या मुलांची विशेष काळजी घेताना दिसत आहे. तो नेहमीच मुलांना भेटण्यासाठी मुंबईत येत असतो. शिवाय त्यांच्या शाळेतही तो नियमितपणे जात असतो.
दरम्यान, २००३ मध्ये करिश्मा आणि संजय विवाहबंधनात अडकले होते. २०१० मध्ये करिश्माने संजयचे घर सोडले. तेव्हापासून ती आपल्या माहेरी राहत होती. त्यानंतर २०१६ मध्ये दोघांनी कायदेशीररीत्या घटस्फोट घेतला. सध्या दोन्ही मुले करिश्माकडे राहत असून, संजय त्यांची काळजी घेताना दिसत आहे. दरम्यान, संजयने दुसरे लग्न केले असून, तो त्याच्या दुसºया पत्नीसोबत दिल्लीत राहतो. परंतु अशातही आपल्या मुलांना वेळ देणे तो अधिक योग्य समजतो.