​केआरके व करण जोहरवर अजयचे खळबळजनक आरोप !!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2016 07:37 AM2016-09-02T07:37:30+5:302016-09-02T13:07:30+5:30

 करणच्या आगामी 'ये दिल है मुश्किल' चित्रपटाचे समिक्षण सकारात्मक करावे आणि अजय देवगणच्या 'शिवाय'चे परिक्षण नकारात्मक करावे यासाठी करण ...

KARK and Karan Johar on the horrific allegations of Ajay !!! | ​केआरके व करण जोहरवर अजयचे खळबळजनक आरोप !!!

​केआरके व करण जोहरवर अजयचे खळबळजनक आरोप !!!

googlenewsNext

/> करणच्या आगामी 'ये दिल है मुश्किल' चित्रपटाचे समिक्षण सकारात्मक करावे आणि अजय देवगणच्या 'शिवाय'चे परिक्षण नकारात्मक करावे यासाठी करण जोहरने कमल आर. खानला २५ लाख रुपये दिल्याच्या संशयावरु न अभिनेता अजय देवगणने करण जोहरची चौकशी व्हावी अशी खळबळजनक मागणी केली आहे. 
केआरकेला फोन करुन यामगचे गौडबंगाल शोधण्यासाठी अजयने त्याचा व्यावसायिक सहकारी कुमार मंगतवर जबाबदारी सोपवली होती.
विशेष म्हणजे 'ये दिल है मुश्किल'विषयी सकारात्मक बोलण्याबद्दल २५ लाख रुपये मिळाले असल्याचे केआरकेने मान्य केले आहे.
केआरके आणि कुमार मंगत यांच्यातील फोनवरील संभाषण रेकॉर्ड झाले असून मीडियाला हे संभाषण देण्यात आले आहे. 
या प्रकारामुळे अजय अस्वस्थ झाला आहे. या प्रकाराची चौकशी व्हावी आणि सत्य उघड व्हावे अशी मागणी त्याने केली आहे.
अजय देवगणने दिलेल्या निवेदनात तो म्हणतो, ‘भारतीय फिल्म इंडस्ट्रीचा मी एक भाग आहे. गेल्या २५ वर्षात १०० चित्रपटात मी काम केलय. माझे वडील व्यावसायिक अ‍ॅक्शन डायरेक्टर होते आणि माझे या इंडस्ट्रीशी भावनिक नाते आहे. कमाल आर खानसारख्या व्यक्तीकडून चित्रपटाची नकारात्म समिक्षा व्हावी यासाठी निमार्ता पैसे खर्च करतो याचे दु:ख वाटते.’ 
‘फिल्म इंडस्ट्रीतील काही लोक अशा गोष्टींना पाठींबा देऊन व्यावसायिक नैतिकता संपवतात. या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करतो. करण जोहर या प्रकारात सहभागी आहे का याची स्पष्टता झाली पाहिजे,’ असे निवेदनात म्हटले आहे.
'शिवाय' हा चित्रपट शिवभक्त असलेल्या व्यक्तीच्या साहसावर आधारित आहे तर 'ये दिल है मुश्किल' हा चित्रपट अनोखी प्रेमकथा आहे.

Web Title: KARK and Karan Johar on the horrific allegations of Ajay !!!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.