कार्तिक आर्यनने मुंबईत खरेदी केले शानदार ऑफिस, किंमत आहे कोटींच्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 04:33 PM2023-09-08T16:33:41+5:302023-09-08T16:34:55+5:30
कार्तिकने मुंबईत नवीन ऑफिससाठी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. ज्याची किंमत कोटींच्या घरात आहे.
कार्तिक आर्यन हा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता. कार्तिकने त्याच्या करिअरच्या छोट्या कारकीर्दीत खुप मोठी मजल मारली आहे. कार्तिकने मुंबईत नवीन ऑफिससाठी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. ज्याची किंमत कोटींच्या घरात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिक आर्यनने ओशिवरामधील लोटस डेव्हलपर्सच्या लोटस 'सिग्नेचर' इमारतीमध्ये नवीन प्रॉपर्टी खरेदी केली आहे. जवळपास 2,100 चौरस फूट पसरलेल्या या कार्यालयाची किंमत 10 कोटी आहे. त्याचे ऑफिस युनिट हे टॉवरच्या चौथ्या मजल्यावर असल्याची माहिती आहे.
कार्तिकने मात्र याविषयी कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही. याच इमारतीमध्ये अभिनेता अमिताभ बच्चन, सारा अली खान, अजय देवगण आणि काजोल यांनीही स्वतःची कार्यालये खरेदी केली आहेत.
कार्तिक आर्यनने या वर्षाच्या सुरुवातीला एक लक्झरी अपार्टमेंट खरेदी केले होते. जुहू परिसरातील प्रेसिडेन्सी सोसायटीमधील सिद्धी विनायक बिल्डिंगमध्ये हे अपार्टमेंट होते. 1916 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या या अपार्टमेंटची किंमत 17.50 कोटी रुपये आहे. दरम्यान कार्तिकच्या कार कलेक्शनमध्ये एक सुपर Lamborghini Urus Capsule कार आहे. जी त्याने 2021 मध्ये खरेदी केली होती. या कारची किंमत सुमारे 3.45 कोटी रुपये आहे.
कार्तिकच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, त्यांचा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणीही पाहायला मिळाली. सध्या कार्तिक 'चंदू चॅम्पियन' चित्रपटात पाहायला मिळणार आहे. कबीर खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. मुरलीकांत पेटकर हे सुवर्णपदक विजेते असून त्यांनी 1972 मध्ये जर्मनी येथे झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकले होते. मीडिया रिपोर्टनुसार हा चित्रपट 14 जून 2024 पर्यंत रिलीज होऊ शकतो.