कार्तिक आर्यनने रेंटवर दिला जुहू येथील फ्लॅट, घरबसल्या महिन्याला कमावणार इतके लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 10:36 IST2024-08-30T10:35:22+5:302024-08-30T10:36:31+5:30
कार्तिक आर्यनने यावर्षी ३० जून रोजी जुहू येथे सिद्धीविनायक प्रेसीडेन्सीमध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता.

कार्तिक आर्यनने रेंटवर दिला जुहू येथील फ्लॅट, घरबसल्या महिन्याला कमावणार इतके लाख
अभिनेता कार्तिक आर्यनने (Kartik Aryan) नुकताच चंदू चॅम्पियन हा ब्लॉकबस्टर सिनेमा दिला. सिनेमातील त्याच्या अभिनयाचं सगळ्यांनीच कौतुक केलं. कार्तिक आपलं हे यश साजरं करत असतानाच आता त्याने आपला एक फ्लॅट भाड्यावर दिला आहे . यातून कार्तिक ची लाखोंची कमाई होणार आहे. किती आहे त्याच्या फ्लॅटच एका महिन्याच भाडं जाणून घ्या.
कार्तिक आर्यनने यावर्षी ३० जून रोजी जुहू येथे सिद्धीविनायक प्रेसीडेन्सीमध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता. याची किंमत तब्बल 17.8 कोटी रुपये होती. यासाठी त्याने 1.5 कोटी स्टॅम्प ड्युटीही भरली होती. तसंच ३० हजार रुपये रजिस्ट्रेशन फीस होती. square yards च्या रिपोर्टनुसार, हा फ्लॅट 1912 स्क्वेअर फीट आहे. आता नुकतंच त्याने हा फ्लॅट भाड्याने दिला आहे. यासाठी तो महिन्याला 4.5 लाख रुपये भाडं घेणार आहे. घरबसल्या कार्तिकची बक्कळ कमाई यातून होणार आहे.
याआधीही गेल्यावर्षी कार्तिकच्या आईवडीलांनीही प्रॉपर्टी खरेदी केली होती. १६.५ कोटी मध्ये त्यांनी याच सोसायटीत एक फ्लॅट खरेदी केला होता. आठव्या मजल्यावर तो फ्लॅट होता. जावेद अख्तर यांनीही याच ठिकाणी फ्लॅट घेतला होता. अनेक सेलिब्रिटींची या सोसायटीला पसंती मिळत आहे.
कार्तिक आर्यन लवकरच 'भूलभूलैय्या 3' मध्ये दिसणार आहे. यामध्ये त्याची जोडी तृप्ती डिमरीसोबत जमली आहे. याशिवाय सिनेमात विद्या बालन, माधुरी दीक्षित यांचीही भूमिका आहे. तसंच कार्तिककडे 'आशिकी 3' हाही सिनेमा आहे.