6 कोटींची कार घेऊन सायकल चालवतोय, चाहत्याने मारला टोमणा; कार्तिक आर्यनचं मजेशीर उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 16:55 IST2024-03-16T16:54:28+5:302024-03-16T16:55:22+5:30
कार्तिक आर्यन त्याच्या साध्या स्वभावामुळे चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. आलिशान कार खरेदी करुनही तो सायकल चालवताना दिसला. यावर काय म्हणाला वाचा

6 कोटींची कार घेऊन सायकल चालवतोय, चाहत्याने मारला टोमणा; कार्तिक आर्यनचं मजेशीर उत्तर
बॉलिवूडमध्ये सध्या 'चॉकलेट बॉय' म्हणून लोकप्रिय असलेला अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) दिवसेंदिवस लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचत आहे. त्याच्या 'सत्यप्रेम की कथा' सिनेमातील अभिनयाने सर्वांचंच मन जिंकलं. सध्या तो 'भूलभूलैय्या 3'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. तर काही दिवसांपूर्वीच कार्तिकने कोट्यवधी रुपयांची आलिशान कार खरेदी केली. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना ही खुशखबरी दिली. पण आज अचानक कार्तिक चक्क सायकल चालवताना दिसला. यावरुन नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत.
कार्तिक आर्यनने कालच नवीन रेंज रोव्हर SUV गाडी घेतली. या कारची किंमत तब्बल 6 कोटी आहे. आपल्या पेट डॉगसोबत डिक्कीत झोपून कार्तिकने मजेशीर फोटो शेअर केला होता. 'अपनी रेंज थोडीसी बढ गयी है' असं कॅप्शन त्याने लिहिलं. तर आता कार्तिकने आजच एक व्हिडिओ शेअर केला . यामध्ये तो कॅज्युअल लूकमध्ये दिसत असून सायकल चालवत आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, 'मी विचार करतोय की सेटवरही सायकलनेच जाऊ'. कार्तिकची ही पोस्ट पाहून अनेक नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं. 'हे बघा 6 कोटींची कार घेऊन आता सायकलवर फिरतोय'. नेटकऱ्याच्या या कमेंटवर कार्तिकने उत्तर देत लिहिले, 'जुन्या सवयी मोडायला वेळ लागतो'.
कार्तिक आर्यनने आपल्या या उत्तराने पुन्हा एकदा चाहत्यांचं मन जिंकलं आहे. 2011 साली 'प्यार का पंचनामा' सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याने सुरुवातीच्या काळात बराच स्ट्रगल केला आहे. मुंबईत पाच मित्रांसोबत तो एकाच खोलीत राहिला. आऊटसाइडर असूनही त्याने मिळवलेलं यश वाखणण्याजोगं आहे.