मी रिक्षाने इव्हेंटला जायचो, मग जुनी कार घेतली, ती सुद्धा..., Karthik Aryanने स्ट्रगल काळात खूप काही भोगलं...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 10:59 AM2022-07-20T10:59:38+5:302022-07-20T11:00:30+5:30
Karthik Aryan : आज कार्तिकचे लाखो चाहते आहेत. पैसा, प्रसिद्धी, ऐश्वर्य सगळं काही आहे, पण काही वर्षांआधी असं नव्हतं. अगदी त्याच्याकडे स्वत:ची गाडीही नव्हती. एका मुलाखतीत कार्तिकने आपल्या स्ट्रगल काळातील अनेक कटू आठवणी शेअर केल्यात....
‘भुल भुलैय्या 2’ या चित्रपटानंतर कार्तिक आर्यनच्या (Karthik Aryan) नावापुढे सुपरस्टार हा टॅग लागला आहे. रिलीजच्या अनेक आठवड्यानंतरही ‘भुल भुलैय्या 2’ची जादू कायम आहे आणि यामुळे कार्तिक आर्यनबॉलिवूडचा लीडिंग स्टार ठरला आहे. अर्थात इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. स्ट्रगल काळात कार्तिकने खूप काही भोगलं. आज कार्तिकचे लाखो चाहते आहेत. पैसा, प्रसिद्धी, ऐश्वर्य सगळं काही त्याच्या पायाशी लोळण घेत आहे, पण काही वर्षांआधी असं काहीही नव्हतं. अगदी त्याच्याकडे स्वत:ची गाडीही नव्हती. एका मुलाखतीत कार्तिकने आपल्या स्ट्रगल काळातील अनेक कटू आठवणी शेअर केल्यात.
रिक्षाने इव्हेंटमध्ये जायचा कार्तिक
‘बॉलिवूड हंगाला’ला दिलेल्या मुलाखतीत कार्तिक म्हणाला, ‘मी इंडस्ट्रीत आलो, तेव्हा माझ्याकडे कार नव्हती. दोन चित्रपट केल्यानंतर मी पहिली कार खरेदी केली होती. ती सुद्धा थर्ड हँड कार होती. 60 हजार रूपयांची ती कार खरेदी करण्यासाठी सुद्धा मला बºयाच अडचणींचा सामना करावा लागला होता. त्या कारच्या दरवाज्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता. पण तरिही मी ती कार घेतली. कारण मी रिक्षा, बाईकवरून किंवा मग लोकांना लिफ्ट मागून इव्हेंटमध्ये जायचो. मी ती गाडी खासकरून रेड कार्पेटवर जाण्यासाठी घेतली होती. पण त्या गाडीचा ना दरवाजा उघडायचा, ना ती ठीक चालायची. इतकंच नाही तर पावसात ती कार लीकेजही व्हायची. पाऊस आल्यावर ड्रायव्हरची सीट ओली होत होती कारण वर छतामधून पाणी टपकत होतं. पण नंतर मला त्याची सवय झाली होती. कुणाकडून लिफ्ट घेण्यापेक्षा माझी ही कार बरी, असं मला वाटायचं.
कार्तिक शिक्षणासाठी मुंबईत आला होता. परंतु, त्याला अभिनय खुणावू लागला होता. अभिनयाकडे ओढा असल्याने त्याने अभ्यास करता करता ऑडिशन द्यायला सुरुवात केली. याचदरम्यान त्याला ‘प्यार का पंचनामा’ हा चित्रपट मिळाला. यानंतर कुठे मला शिकायचं नसून अभिनय करायचा आहे, असं त्याने आईवडिलांना सांगितलं होतं.
‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाने कार्तिकला मोठी ओळख दिली. चित्रपटातून ओळख मिळाली. कधीकाळी ६० हजारांच्या गाडीतून फिरणारा कार्तिक आज कोट्यवधींच्या गाड्यांचा मालक आहे. ‘भुल भुलैया 2’ चे निर्माते भूषण कुमार यांनी नुकतीच कार्तिकला तब्बल 5 कोटींची गाडी भेट दिली होती.