'पठाण'ला टक्कर देण्यासाठी 'शहजादा'सज्ज; 110 रुपयांच्या ऑफरला 'बाय वन गेट वन'ची कार्तिकची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 14:39 IST2023-02-17T14:36:31+5:302023-02-17T14:39:43+5:30
'पठाण'ला टक्कर देण्यासाठी कार्तिक आर्यनचा 'शहजादा'सज्ज झाला आहे. 110 रुपयांच्या ऑफरला बाय वन गेट वनने देणार टक्कर.

'पठाण'ला टक्कर देण्यासाठी 'शहजादा'सज्ज; 110 रुपयांच्या ऑफरला 'बाय वन गेट वन'ची कार्तिकची घोषणा
Shehzada Day 1 Box Office: अभिनेता कार्तिक आर्यनने आता बॉलिवूडच्या बादशाहला टक्कर दिली आहे. कार्तिकचा 'शहजादा' हा सिनेमा आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. शहजादाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. कार्तिकची अॅक्शन भूमिका चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. सोशल मीडियावर शहजादा ट्रेंड होतोय. हा चित्रपट पाहण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी सिनेमाघरात यावं म्हणून कार्तिकने या सिनेमाचे जोरदार प्रमोशन केलं आहे.
शहजादा रिलीज होण्यापूर्वी २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला पठाण ३ आठवडे उलटून गेले तरी तुफान कमाई करत आहे. याच निमित्ताने आज शुक्रवारी सर्वत्र 'पठाण' डे साजरा करण्यात येत आहे. केवळ ११० रुपयांत थिएटरमध्ये पठाण बघता येणार आहे. एकीकडे पठाणची क्रेझ कायम असताना दुसरीकडे दर्शकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कार्तिक आर्यनने प्रमोशनचा एक अनोखा फंडा वापरला आहे.
कार्तिक आर्यनने, शहजादा चित्रपटाचं एका तिकीट खरेदी केल्यास दुसरं मोफत मिळणार आहे. यासाठी 'शहजादा' प्रोमो कोड वापरावा लागेल. वास्तविक, अभिनेत्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो
चिमुकल्यासोबत बोलताना दिसत आहे. चिमुरड्याशी मजेदार पद्धतीने बोलत कार्तिक शहजादाचं प्रमोशन करतोय.
शहजादा रोहित धवनने दिग्दर्शित केला आहे. यामध्ये कार्तिक आर्यन, क्रिती सेनन, मनिषा कोईराला, परेश रावल, रोनित रॉय आणि सचिन खेडेकर यांची भूमिका आहे. उद्या १७ फेब्रुवारी रोजी सिनेमा प्रदर्शित होत आहे.