कार्तिक आर्यनच्या ‘Bhool Bhulaiyaa 2’वरून सुरू झाला वेगळाच वाद; वाचा, काय आहे भानगड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 05:45 PM2022-05-26T17:45:33+5:302022-05-26T17:46:45+5:30
Bhool Bhulaiyaa 2 Controversy : कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा ‘भुल भुलैय्या 2’ हा सिनेमा एकीकडे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. दुसरीकडे या चित्रपटावरून सोशल मीडियावर वेगळाच वाद सुरू झाला आहे.
Bhool Bhulaiyaa 2 Controversy : कार्तिक आर्यन (Kartik Aaryan)आणि कियारा अडवाणीचा (Kiara Advani) ‘भुल भुलैय्या 2’ (Bhool Bhulaiyaa 2) हा सिनेमा एकीकडे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. दुसरीकडे या चित्रपटावरून सोशल मीडियावर वेगळाच वाद सुरू झाला आहे. होय, रिलीजच्या 7 दिवसानंतर या सिनेमावरून एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कार्तिकच्या या सिनेमात लहान मुलांच्या लठ्ठपणाची खिल्ली उडवण्यात आल्याचा आरोप करत, काहींनी या चित्रपटाला ट्रोल केलं आहे.
कॉमेडीच्या नावावर हा चित्रपट लहान मुलांच्या लठ्ठपणाची खिल्ली उडवतो. हे फॅट शेमिंग चुकीचं आहे. चित्रपटात एका लहान मुलाला अनेकदा बॉडीशेम केलं गेलं आहे, हे गैर असल्याचं अनेक युजरने म्हटलं आहे. काहींनी मात्र चित्रपटाचा सपोर्ट केला आहे. आपण चित्रपट पाहताना त्यातील कॉमेडी कशाप्रकारे घेतो, यावर सगळं काही अवलंबून आहे, असं एकाने म्हटलं आहे. ‘काल रात्री मी हा सिनेमा पाहिला. पे्रक्षक त्या मुलावरचे जोक्स पाहून हसत होते. त्यात फॅट शेमिंग सारखं काहीही नाहीये,’ असं मत एका युजरने व्यक्त केलं आहे.
सहा दिवसांत बजेट वसूल
गेल्या 20 मे रोजी ‘भुल भुलैय्या 2’ हा सिनेमा रिलीज झाला आणि रिलीज होताच या सिनेमानं अक्षरश: धुमाकूळ घातला. कार्तिक आर्यनने तर सगळ्यांनाच वेड लावलं आहे. रिलीज झाल्यापासून कार्तिकच्या या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. केवळ चार दिवसांत या चित्रपटाने 60 कोटींची कमाई केली आहे आणि सहा दिवसांत एकूण 84.78 कोटींचा गल्ला जमवत बजेट वसूल केला आहे.पहिल्या दिवशी या चित्रपटाने 14.11 कोटीची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 18.34कोटी, तिसऱ्या दिवशी 23.51 कोटी, चौथ्या दिवशी 10.75 कोटी आणि पाचव्या दिवशी 9.56 कोटींचा बिझनेस केला. काल बुधवारी सहाव्या दिवशी या चित्रपटाने 8.51 कोटी कमावले.
‘भुल भुलैय्या 2’चा बजेट 70 ते 80 कोटी आहे आणि चित्रपटाने सहा दिवसांत 84.78 कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच, कार्तिकच्या या चित्रपटाने सहाच दिवसांत बजेट वसूल केला आहे.