कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' ओटीटीवर होणार रिलीज, कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 11:01 AM2024-07-29T11:01:24+5:302024-07-29T11:02:01+5:30

'चंदू चॅम्पियन' या सिनेमाचं सर्वत्र कौतुक झालं. हा सिनेमा प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला. आता हा सिनेमा ओटीटी प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

kartik aaryan chandu champion movie set to release on ott when and where all details | कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' ओटीटीवर होणार रिलीज, कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या

कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' ओटीटीवर होणार रिलीज, कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत असलेला 'चंदू चॅम्पियन' सिनेमा अलिकडेच प्रदर्शित झाला होता. भारतातील पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमात कार्तिक मुरलीकांत यांच्या भूमिकेत आहे. आता लवकरच हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

'चंदू चॅम्पियन' या सिनेमाचं सर्वत्र कौतुक झालं. हा सिनेमा प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला. पण, बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला चांगली कमाई करता आली नाही. १२० कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमाने पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर ३५.२५ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या आठवड्यात २०.२५ कोटी आणि तिसऱ्या आठवड्यात केवळ ४.८५ कोटींचा बिजनेस केला. या सिनेमाने देशभरात ६१.८० कोटींचा गल्ला जमवला. तर जगभरात ८७.२५ कोटींची कमाई केली.


आता हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय टीमने घेतला आहे. १४ जूनला प्रदर्शित झालेला 'चंदू चॅम्पियन' ओटीटी प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे ९ ऑगस्टला 'चंदू चॅम्पियन' सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. प्राइम व्हिडिओवर कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे आता घरबसल्या हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

'चंदू चॅम्पियन' या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियादवाला आणि कबीर खान यांनी केली आहे. ट्रेलर पाहूनच सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली होती.  या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीदेखील झळकली आहे. तिने कार्तिकच्या आईची भूमिका साकारली आहे. 

Web Title: kartik aaryan chandu champion movie set to release on ott when and where all details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.