Bhool Bhulaiyaa 2 Box Office Collection : कार्तिक आर्यन ‘हिरो नंबर 1’, सहाच दिवसांत ‘भुल भुलैय्या 2’ने केली इतक्या कोटींची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 03:20 PM2022-05-26T15:20:02+5:302022-05-26T15:21:30+5:30
Bhool Bhulaiyaa 2 Vs Dhaakad Box Office Collection Day 6 : एकीकडे कार्तिक आर्यनचा ‘भुल भुलैय्या 2’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना कंगना राणौतच्या ‘धाकड’ची अवस्था वाईट आहे. सहा दिवसांत कंगनाच्या या चित्रपटाने केवळ 4.01 कोटींची कमाई केली आहे.
गेल्या 20 मे रोजी ‘भुल भुलैय्या 2’ (Bhool Bhulaiyaa 2 )हा सिनेमा रिलीज झाला आणि रिलीज होताच या सिनेमानं अक्षरश: धुमाकूळ घातला. कार्तिक आर्यनने (Kartik Aaryan) तर सगळ्यांनाच वेड लावलं. रिलीज झाल्यापासून कार्तिकच्या या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. केवळ चार दिवसांत या चित्रपटाने 60 कोटींची कमाई केली आहे आणि सहा दिवसांत एकूण 84.78 कोटींचा गल्ला जमवत बजेट वसूल केला आहे.
पहिल्या दिवशी या चित्रपटाने 14.11 कोटीची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 18.34कोटी, तिसऱ्या दिवशी 23.51 कोटी, चौथ्या दिवशी 10.75 कोटी आणि पाचव्या दिवशी 9.56 कोटींचा बिझनेस केला. काल बुधवारी सहाव्या दिवशी या चित्रपटाने 8.51 कोटी कमावले.
‘भुल भुलैय्या 2’चा बजेट 70 ते 80 कोटी आहे आणि चित्रपटाने सहा दिवसांत 84.78 कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच, कार्तिकच्या या चित्रपटाने सहाच दिवसांत बजेट वसूल केला आहे.
#BhoolBhulaiyaa2 continues to spell magic... SUPERB TRENDING on weekdays... This one is not going to slow down soon... All set for ₹ 92 cr+ total in *Week 1*... Fri 14.11 cr, Sat 18.34 cr, Sun 23.51 cr, Mon 10.75 cr, Tue 9.56 cr, Wed 8.51 cr. Total: ₹ 84.78 cr. #India biz. pic.twitter.com/9mNHQ5X3sT
— taran adarsh (@taran_adarsh) May 26, 2022
‘भुल भुलैय्या 2’ हा ‘भुल भुलैय्या’ या चित्रपटाचा सीक्वल आहे. पहिल्या पार्टमध्ये अक्षय कुमार व विद्या बालन लीड रोलमध्ये होते. ‘भुल भुलैय्या 2’मध्ये कार्तिक आर्यन व कियारा अडवाणी लीड रोलमध्ये आहेत.
कंगना राणौतचा ‘धाकड’ आपटला
एकीकडे कार्तिक आर्यनचा ‘भुल भुलैय्या 2’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना कंगना राणौतच्या ‘धाकड’ची (Dhaakad Box Office) अवस्था वाईट आहे. सहा दिवसांत कंगनाच्या या चित्रपटाने केवळ 4.01 कोटींची कमाई केली. 100 कोटी बजेटचा हा सिनेमा सुपरडुपर फ्लॉप झाला आहे. प्रेक्षकच नसल्याने अनेक चित्रपटगृहांतील ‘धाकड’चे शो रद्द होत आहेत. जाणकारांचे मानाल तर ‘धाकड’ 10 कोटींपर्यंत पोहोचेल, हेही कठीण दिसतेय.