Kartik Aaryan ने फॅन्सना दिलं नवं चॅलेंज, बघा तुम्ही करू शकता का पूर्ण?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 05:51 PM2022-05-05T17:51:18+5:302022-05-05T17:51:53+5:30

Kartik Aaryan new ZigZag Step Challenge: 'भूल भुलैया २' सिनेमाचं टायटल सॉंग ट्रेक 'तेरी आंखे भूल भुलैया, बातें हैं भूल भुलैया' रिलीज करण्यात आलं आहे. जे लोकांना आवडलं

Kartik Aaryan gave a new challenge to the fans, watch video | Kartik Aaryan ने फॅन्सना दिलं नवं चॅलेंज, बघा तुम्ही करू शकता का पूर्ण?

Kartik Aaryan ने फॅन्सना दिलं नवं चॅलेंज, बघा तुम्ही करू शकता का पूर्ण?

googlenewsNext

Kartik Aaryan new ZigZag Step Challenge: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या त्याच्या आगामी 'भूल भुलैया २'(Bhool Bhulaiyaa 2) सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. यात तो अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत (Kiara Advani) दिसणार आहे. २० मे रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. अशात त्याने या सिनेमासंबंधी एक चॅलेंज फॅन्ससाठी घेऊन आला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत हे चॅलेंज दिलं आहे

'भूल भुलैया २' सिनेमाचं टायटल सॉंग ट्रेक 'तेरी आंखे भूल भुलैया, बातें हैं भूल भुलैया' रिलीज करण्यात आलं आहे. जे लोकांना आवडलं आणि त्यातील कार्तिकचा अंदाजही आवडला आहे. कार्तिक यात जबरदस्त डान्स मुव्ह्स करताना दिसत आहे. या गाण्यात कार्तिकने केलेली झिक झॅक स्टेपचं चॅलेंज त्याने फॅन्सना दिलं आहे. कार्तिकने स्टेपचा डान्स व्हिडीओ शेअर करत कॅप्शन दिलं की, '#ZigZagStep Challenge, आता तुम्ही रील बनवा'.

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. या दोघांसोबतच या सिनेमात अभिनेत्री तबू आणि राजपाल यादवही दिसणार आहे. आधीच्या सिनेमासारखाच हा सिनेमा देखील हॉरर कॉमेडी असणार आहे. हा सिनेमा तुम्हाला पोट धरून हसवण्यासाठी २० मे रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे. आता हे बघणं महत्वाचं ठरणार आहे की, कार्तिक आणि कियारा अक्षय कुमार आणि विद्या बालनसारखी जादू स्क्रीनवर करतात की नाही.  
 

Web Title: Kartik Aaryan gave a new challenge to the fans, watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.