Kartik Aaryan : कार्तिक आर्यनला इकॉनॉमी क्लासमध्ये पाहून प्रवाशांचा आनंद गगनात मावेना, पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 15:40 IST2022-09-20T15:39:44+5:302022-09-20T15:40:04+5:30
Kartik Aaryan : कार्तिकने जोधपूरवरून मुंबईसाठी इकॉनॉमी क्लासमधून प्रवास केला. आपल्यासोबत कार्तिक आर्यन नावाचा स्टार बसलाय म्हटल्यावर विमानातील इकॉनॉमी क्लासचे प्रवासी अगदी क्रेझी झालेत.

Kartik Aaryan : कार्तिक आर्यनला इकॉनॉमी क्लासमध्ये पाहून प्रवाशांचा आनंद गगनात मावेना, पाहा VIDEO
सध्या सगळीकडे कार्तिक आर्यनचीच (Kartik Aaryan ) चर्चा पाहायला मिळतेय. कार्तिक जिथे जाईल, तिथे त्याच्याभोवती गर्दी जमते. कालपरवा कार्तिकचा एक छोटाचा फॅन त्याला पाहताच रडू लागला होता. आपला चाहता रडतोय म्हटल्यावर कार्तिक धावत त्याच्या जवळ गेला होता. त्याच्यासोबत फोटो काढून घेत, त्याने त्याला प्रेमाने मिठी मारली होता. कार्तिकचं हे वागणं पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं होतं आणि आता कार्तिकच्या अशाच एका कृतीने चाहत्यांची मनं जिंकलीत.
कार्तिकने जोधपूरवरून मुंबईसाठी इकॉनॉमी क्लासमधून प्रवास केला. आपल्यासोबत कार्तिक आर्यन नावाचा स्टार बसलाय म्हटल्यावर विमानातील इकॉनॉमी क्लासचे प्रवासी अगदी क्रेझी झालेत. खरं तर कार्तिक अगदी गपचूप आपल्या सीटवर बसला होता. आपण इथे आहोत, हे लोकांना कळणार नाही, असा त्याचा समज होता. पण आपल्यासोबत कार्तिक प्रवास करतोय, हे कळायला प्रवाशांना वेळ लागला नाही. मग काय, कार्तिकला पाहून सगळेच एकदम खुश्श झालेत.
सगळ्यांनी कार्तिकचं जोरदार स्वागत केलं. अनेकांनी त्याचे फोटो काढले. त्याचे व्हिडीओ बनवले. कार्तिकही हे प्रेम पाहून भारावून गेला. त्याने आपल्या जागेवर उभं होत सर्वांना अभिवादन करत त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला.
विमानातील कार्तिकचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहे. बॉलिवूडचा सगळ्यात विनम्र अभिनेता, अशा शब्दांत अनेकांनी कार्तिकचं कौतुक केलं आहे. सुशांत सिंग राजपूत नंतर हाच आहे लोकांचा आवडता स्टार,अशी कमेंट एका युजरने केली. कार्तिक हे प्रेम तू डिसर्व्ह करतोस, अशा कमेंट अनेक युजर्सनी केल्यात.
‘भूलभुलैया 2’ सिनेमाच्या प्रमोशन वेळीही कार्तिकनं विमानातून इकॉनॉमी क्लासमधून प्रवास केला होता. मी लक्झरी लाईफ जगत असलो तरी आजही इकॉनॉमी क्लासमधूनच प्रवास करतो, असं कार्तिक एका मुलाखतीत म्हणाला होता.
कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच तो फ्रेडी, शहजादा या सिनेमात झळकणार आहे. सत्यप्रेम की कथा या सिनेमातही तो दिसणार आहे. ‘आशिकी 3’ या चित्रपटातही त्याची वर्णी लागली आहे.