Kartik Aaryan : काय सांगता? ...म्हणून कार्तिक आर्यनची उडाली झोप; अभिनेत्याने सांगितली 'मन की बात'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 14:15 IST2023-06-07T14:04:33+5:302023-06-07T14:15:31+5:30
Kartik Aaryan : कार्तिक आर्यन अपकमिंग फिल्म 'सत्यप्रेम की कथा' यामुळे खूप चर्चेत आला आहे.

Kartik Aaryan : काय सांगता? ...म्हणून कार्तिक आर्यनची उडाली झोप; अभिनेत्याने सांगितली 'मन की बात'
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) अपकमिंग फिल्म 'सत्यप्रेम की कथा' यामुळे खूप चर्चेत आला आहे. अभिनेता कार्तिक आर्यन सत्यप्रेम की कथेबद्दल इतका उत्साहित आहे की त्याची आजकाल झोप उडाली आहे. सत्यप्रेम की कथेचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अभिनेत्याने चित्रपटाच्या टीमसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "काल रात्री नर्व्हसनेसमुळे झोपू शकलो नाही आणि आज आनंद खूप झाला म्हणून"
अभिनेत्याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. जिथे सत्यप्रेम की कथा अभिनेत्री कियारा अडवाणीसह चित्रपटाची संपूर्ण टीम अभिनेत्यासोबत हसताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये कार्तिकने खुलासा केला आहे. त्य़ाच्या या पोस्टची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
भूल भुलैया 2 च्या यशानंतर कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांची जोडी पुन्हा एकदा एका सस्पेन्सफुल रोमँटिक लव्हस्टोरी मोठ्या पडद्यावर घेऊन येणार आहे. या चित्रपटात कार्तिक-कियारा गुजराती स्टाईलमध्ये रोमान्स करताना दिसणार आहेत. साजिद नाडियाडवाला यांच्या सत्यप्रेम की कथा या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.
ट्रेलरमध्ये कार्तिक-कियाराची रोमँटिक केमिस्ट्री पाहिल्यानंतर आता चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सत्यप्रेम की कथा 29 जून 2023 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. कार्तिक-कियारा यांच्या सत्यप्रेम की कथामध्ये गजराव राव आणि सुप्रिया पाठक यांच्यासह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.