‘या’ दिवशी प्रदर्शित होणार कार्तिक व क्रितीचा ‘लुका-छिपी’!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 03:51 PM2018-12-11T15:51:27+5:302018-12-11T15:52:48+5:30
राजकुमार राव व श्रद्धा कपूरचा ‘स्त्री’ हा ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर निर्माते दिनेश विजान आपल्या आगामी चित्रपटासाठी सज्ज आहे. या चित्रपटात ‘सोनू के टीटू की स्वीटी’ फेम अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री क्रिती सॅनन लीड रोलमध्ये आहे. या चित्रपटाचे नाव आहे, ‘लुका-छिपी’.
राजकुमार राव व श्रद्धा कपूरचा ‘स्त्री’ हा ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर निर्माते दिनेश विजान आपल्या आगामी चित्रपटासाठी सज्ज आहे. या चित्रपटात ‘सोनू के टीटू की स्वीटी’ फेम अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री क्रिती सॅनन लीड रोलमध्ये आहे. या चित्रपटाचे नाव आहे, ‘लुका-छिपी’. या रोमॅन्टिक चित्रपटाचा फर्स्ट लूक आधीच रिलीज झाला होता. आता या चित्रपटाची रिलीज डेट जारी करण्यात आली आहे.
Kartik Aaryan and Kriti Sanon... After the stupendous success of #Stree, producer Dinesh Vijan announces release date of #LukaChuppi: 1 March 2019... Costars Aparshakti Khurana, Pankaj Tripathi and Vinay Pathak... Directed by Laxman Utekar... Official announcement: pic.twitter.com/M0sxVcRrap
— taran adarsh (@taran_adarsh) December 11, 2018
होय, आजपासून ३ महिन्यानंतर म्हणजे, १ मार्च २०१९ रोजी हा चित्रपट पे्रक्षकांच्या भेटीस येणार आहे. अर्थात या तारखेला ‘लुका-छिपी’ला बॉक्सआॅफिसवर कडवी झुंज द्यावी लागणार आहे. होय, अर्जुन कपूर व परिणीती चोप्राचा ‘संदीप और पिंकी’ नेमक्या याच तारखेला प्रदर्शित होतोय. त्यामुळे बॉक्सआॅफिसवर ‘लुका-छिपी’ विरूद्ध ‘संदीप और पिंकी’ असा थेट मुकाबला पाहायला मिळेल. तूर्तास या दोन्ही चित्रपटांचा टीजर, ट्रेलर रिलीज व्हायचाय. कदाचित यासाठी प्रेक्षकांना नव्या वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार.
‘लुका-छिपी’ मध्ये दिनेश विजान यांनी कार्तिक व क्रितीला लीड भूमिकेत घेतलेय. पण उर्वरित अख्खी टीम ‘स्त्री’ची आहे. कार्तिक व क्रितीशिवाय आयुष्यमान खुराणाचा भाऊ अपारशक्ती खुराणा, पंकज त्रिपाठी, विनय पाठक यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. लक्ष्मण उतेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. कार्तिक यात एक लोकल टीव्हीचा स्टार रिपोर्टरची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर क्रिती सॅनन त्याच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारणार आहे. यासिनेमात दोघांना प्रादेशिक भाषा बोलायची आहे यासाठी दोघे खूप मेहनत घेतायेत.