लुका छुपीने पहिल्या दिवशी केली दमदार कमाई, कार्तिकने बनवला हा नवा रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 15:10 IST2019-03-02T15:07:25+5:302019-03-02T15:10:28+5:30
कार्तिक आर्यन क्रिती सॅनन स्टारर लुका-छुपी सिनेमा काल (शुक्रवारी) रसिकांच्या भेटीला आहे. पहिल्याच दिवशी सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला आहे.

लुका छुपीने पहिल्या दिवशी केली दमदार कमाई, कार्तिकने बनवला हा नवा रेकॉर्ड
कार्तिक आर्यन क्रिती सॅनन स्टारर लुका-छुपी सिनेमा काल (शुक्रवारी) रसिकांच्या भेटीला आहे. पहिल्याच दिवशी सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला आहे. त्याचसोबत एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
#LukaChuppi is Kartik Aaryan’s biggest opener... Opening day biz:
— taran adarsh (@taran_adarsh) 2 March 2019
2019: #LukaChuppi ₹ 8.01 cr
2015: #PyaarKaPunchnama2 ₹ 6.80 cr
2018: #SonuKeTituKiSweety ₹ 6.42 cr
2011: #PyaarKaPunchnama - which shot Kartik to fame - had collected ₹ 92 lakhs on Day 1.
India biz.
ट्रेंड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर ट्विट करुन या सिनेमाने पहिल्या दिवशी 8 कोटी रुपयांचा गल्ला जमावल्याची माहिती दिली आहे. याचसोबत कार्तिक आर्यन याच्या करिअरमधला सर्वाधिक ओपनिंग करणार हा सिनेमा ठरला आहे. या आधी कार्तिकच्या सोनू के टीटू की स्वीटी ने 6.42 कोटी रुपयांची कमाई केली होती तर प्यार का पंचनामा 2'ने 6 कोटी 80 लाखांची कमाई केली होती. यामुळे लुका-छुपी ओपनिंगला सर्वाधिक कमाई करणार त्याच्या करिअरमधला पहिला सिनेमा ठरला आहे.
कार्तिकने या सिनेमात ग्वाल्हेरच्या एका मुलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. लग्नासाठी उतावीळ असलेला कार्तिक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असतो.तो लग्नासाठी क्रितीला प्रपोजही करतो. पण क्रिती त्याला लिव्ह इनमध्ये राहण्याचा पर्याय सुचवते. यानंतर दोघांचे नाते चांगलेच गुंतते. इतके की, पुढे दोघेही खोट्या लग्नाच्या खोट्या बाता मारताना दिसतात. दिनेश विजान निर्मित हा चित्रपट सिनेमेट्रोग्राफर लक्ष्मण उतेकरने दिग्दर्शित केला आहे. या सिनेमातून कार्तिक आर्यन व क्रिती सॅनन ही जोडी प्रथमच प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतेय.