'माझा अंधश्रद्धेवर विश्वास नाही पण...'; रात्री एकट्याने झोपताना 'या' अभिनेत्याला वाटते भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 07:12 PM2022-05-06T19:12:59+5:302022-05-06T19:14:05+5:30
Kartik aaryan: या अभिनेत्याने अलिकडेच एका हॉरर चित्रपटात काम केलं आहे. त्यामुळे त्याच्या या भीतीची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
मी खूप साहसी किंवा धाडसी आहे असं म्हणणारे अनेक असतात. परंतु, प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटत असते. यात कोणाला उंच कड्याची भीती वाटते, कोणाला पाण्याची भीती वाटते तर कोणाला अंधाराचीही भीती वाटते. हीच अंधाराची भीती एका लोकप्रिय अभिनेत्याला वाटते. विशेष म्हणजे अंधाराची भीती वाटणाऱ्या या अभिनेत्याने अलिकडेच एका हॉरर चित्रपटात काम केलं आहे. त्यामुळे त्याच्या या भीतीची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
लवकरच कार्तिक आर्यनची ( kartik aaryan) मुख्य भूमिका असलेला 'भुलभुलैय्या 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या कार्तिक या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जोरदार तयारी करत आहे. विशेष म्हणजे हॉरर जॉनर असलेल्या या चित्रपटात कार्तिक मुख्य भूमिका साकारत असून त्यालाच पात्री अंधाराची भीती वाटते. अलिकडेच एका कार्यक्रमात त्याने या गोष्टीचा खुलासा केला.
"हा चित्रपट करण्यासाठी मी खूप आतुर होतो यासाठी काही कारणं आहेत. पहिल्यांदाच मी या चित्रपटाच्या निमित्ताने हॉरर जॉनरमध्ये काम करायची संधी मिळाली. या चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बज्मी माझ्याकडे या चित्रपटाची स्टोरी घेऊन आले आणि त्यांनी मला प्रथम सगळी कथा ऐकवली त्यानंतर चित्रपटाचं नाव सांगितलं. त्यानंतर एका फ्रेश कथेसह या चित्रपटाचा सिक्वेल तयार करण्यात आला. हा चित्रपट पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की जग तेच आहे पण कथा पूर्णपणे नवी", असं कार्तिक म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "चित्रपटाचं शुटिंग सुरु असताना रुह बाबाचे कपडे परिधान केल्यानंतर मला एकदम सुपर हिरोवाली फिलिंग आली होती. मी सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे मला लॉजिक्स फार महत्त्वाचं वाटतं. पण, दिग्दर्शक तुम्हाला वेगळ्याच जहात घेऊन जातात. जे पाहिल्यावर घाम फुटतो."
कार्तिकला वाटते अंधाराची भीती
या मुलाखतीमध्ये कार्तिकने त्याला अंधाराची भीती असल्याचंही सांगितलं. "मला अंधाराची प्रचंड भीती वाटते. आजही मी कोणत्या हॉटेलच्या मोठ्या रुममध्ये राहात असेन तर मी अजिबात लाईट बंद करत नाही. मी एक तरी लाईट चालूच ठेवतो. ज्यावेळी तुम्ही एकटे झोपता तुमच्या मनात नको नको ते विचित्र विचार येतात. त्या भीतीपोटीच मी घाबरुन एक लाईट चालू ठेवतो. हा पण मी अंधविश्वासून नाहीये. पण, काही शक्तींवर माझा विश्वास आहे. गुड आणि बॅड एनर्जी तर प्रत्येकालाच कळून येते."
दरम्यान, कार्तिक आर्यनबॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. आजपर्यंत त्याने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.