Video : कार्तिक आर्यनला १० वर्षांनी मिळाली अभियांत्रिकीची पदवी, स्टेजवर दिला ग्रँड परफॉर्मन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 12:28 IST2025-01-12T12:27:38+5:302025-01-12T12:28:59+5:30

कार्तिकनं अभिनयासाठी अभियांत्रिकीचं शिक्षण अर्धवट सोडलं होतं.

Kartik Aaryan Receives Engineering Degree At Dy Patil University After Over A Decade Shares Video | Video : कार्तिक आर्यनला १० वर्षांनी मिळाली अभियांत्रिकीची पदवी, स्टेजवर दिला ग्रँड परफॉर्मन्स

Video : कार्तिक आर्यनला १० वर्षांनी मिळाली अभियांत्रिकीची पदवी, स्टेजवर दिला ग्रँड परफॉर्मन्स

Kartik Aaryan Is Finally A Graduate: बॉलिवूडमध्ये गॉडफादरशिवाय स्टार बनलेल्या कलाकारांच्या यादीत कार्तिक आर्यनचं (Kartik Aaryan) नाव येतं. कार्तिकने स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज कार्तिक मोठा स्टार असला तरी त्याची सुरुवात एवढी सोपी नव्हती. कार्तिकने अभियंता व्हावे अशी त्याच्या आईवडिलांची इच्छा होती. पण, कार्तिकनं अभिनयासाठी अभियांत्रिकीचं शिक्षण अर्धवट सोडलं होतं. आता अखेर कार्तिक आर्यन अभियंता (Kartik Aaryan Gets His Engineering Degree) झाला आहे.  

 नवी मुंबईतील डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या ( DY Patil University convocation) दीक्षांत समारंभात  (११ जानेवारी २०२४)  कार्तिक आर्यनला अभियांत्रिकीची पदवी प्रदान करण्यात आली. तब्बल एक दशकानंतर कार्तिकने ही पदवी मिळवली आहे. कार्तिकने आपल्या इन्स्टाग्रामवर या समारंभाचे काही क्षण शेअर केले आहेत. व्हिडीओमध्ये  कार्तिक विद्यार्थ्यांबरोबर नाचताना आणि आपल्या कॉलेजच्या आठवणींमध्ये रमताना दिसला. कार्तिकच्या चेहऱ्यावर इंजिनिअर झाल्याचा आनंद स्पष्ट दिसून आला. 

व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये कार्तिकने लिहलं, "बॅकबेंचर ते आज मंचावर उभं राहून पदवी स्वीकारण्यापर्यंतचा हा प्रवास खूपच अद्भुत आहे. डी. वाय. पाटील कॉलेजने मला खूप आठवणी दिल्या, स्वप्न दिली आणि अखेर माझी पदवीही दिलीत (त्यासाठी फक्त दहा वर्ष लागले). विजय पाटील सर, माझे शिक्षक, आणि येथील तरुण स्वप्नवेड्या विद्यार्थ्यांनो, तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद... मला माझ्या घरी परत आल्यासारखं वाटतंय". कार्तिकच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय. 


ग्वाल्हेरमध्ये जन्मलेला कार्तिक आर्यन एका सुशिक्षित कुटुंबातील आहे. कार्तिकचे वडील मनीष तिवारी हे बालरोगतज्ञ आहेत आणि आई माला तिवारी स्त्रीरोगतज्ञ आहेत. याशिवाय कार्तिकची लहान बहीण किर्तीदेखील एक डॉक्टर आहे. कार्तिकनेअभियंता व्हावं, यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी त्याला मुंबईतील डीवाय पाटील विद्यापीठात इंजिनीअरिंगला प्रवेश दिला होता. पण,  कार्तिकच्या मनात हिरो बनण्याची इच्छा निर्माण झाली आणि कार्तिक इंजिनीअरिंगचे वर्ग बंक करून चित्रपटांच्या ऑडिशन द्यायचा. बराच काळ संघर्ष केला.  जेव्हा तो मुंबईत आला, तेव्हा इतका संघर्ष करावा लागेल असे कधीच वाटले नव्हते. पण, अखेर त्याला मेहनतीचं फळ मिळालं. बॉलिवूड स्टार झाल्यावर आपल्या आईच्या आग्रहास्तव कार्तिकने पदवी पूर्ण केली. आता कार्तिकदेखील अभियंता आहे. 

Web Title: Kartik Aaryan Receives Engineering Degree At Dy Patil University After Over A Decade Shares Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.