Chandu champion: कार्तिकच्या मेहनतीला सलाम! अंगात ताप असूनही पाण्यात केलं तब्बल ९ तास शुटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 11:42 AM2024-06-28T11:42:01+5:302024-06-28T11:42:47+5:30

Kartik aaryan: या सिनेमासाठी ट्रेनिंग घेत असतांना कार्तिकच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली होती. यामध्येच त्यांच्या अंगात ताप असल्यामुळे डोळेही दुखत होते. परंतु, तरी सुद्धा त्याने चित्रीकरण थांबवलं नाही.

kartik-aaryan-shares-bts-video-of-chandu-champion-did-intense-swimming-in-high-fever | Chandu champion: कार्तिकच्या मेहनतीला सलाम! अंगात ताप असूनही पाण्यात केलं तब्बल ९ तास शुटिंग

Chandu champion: कार्तिकच्या मेहनतीला सलाम! अंगात ताप असूनही पाण्यात केलं तब्बल ९ तास शुटिंग

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (kartik aryan) याचा चंदू चॅम्पियन हा सिनेमा रिलीज होऊन आता बरेच दिवस झाले आहेत. मात्र, अजूनही त्याची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरु आहे. देशातील पहिले पॅरालाम्पिक गोल्ड मेडलिस्ट मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतोय. या सिनेमात मुरलीकांत पेटकर यांच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी कार्तिकने प्रचंड मेहनत घेतली. नुकताच त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने भूमिका साकारण्यासाठी कशी मेहनत घेतली हे दिसून येत आहे.

अंगात ताप असतांनाही कार्तिकने केलं शुटिंग

मुरलीधर पेटकर यांच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी कार्तिकने प्रचंड मेहनत घेतली. कार्तिकने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिक कडाक्याच्या थंडीत स्विमिंग करतांना दिसत आहे. विशेष म्हणजे या सिनेमासाठी कार्तिक खासकरुन स्विमिंग शिकला. या सिनेमासाठी ट्रेनिंग घेत असतांना कार्तिकच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली होती. यामध्येच त्यांच्या अंगात ताप असल्यामुळे डोळेही दुखत होते. परंतु, तरी सुद्धा त्याने चित्रीकरण थांबवलं नाही. जवळपास ९ तास त्याने अशा अवस्थेत सिनेमाचं शूट केलं.

दरम्यान, या सिनेमात मुरलीधर पेटकर यांच्यासारखी शरीरयष्टी करण्यासाठी कार्तिकने जवळपास २ वर्ष गोड पदार्थ खाणं वर्ज्य केलं होतं. या सिनेमात कार्तिकसह राजपाल यादव, विजय राज, भुवन अरोरा, यशपाल शर्मा आणि अनिरुद्ध दवे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

Web Title: kartik-aaryan-shares-bts-video-of-chandu-champion-did-intense-swimming-in-high-fever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.