'सोनू के टीटू की स्वीटी' सिनेमाचा सिक्वेल येणार, कोण साकारणार मुख्य भूमिका? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 03:25 PM2024-12-04T15:25:33+5:302024-12-04T15:26:23+5:30
'सोनू के टीटू की स्वीटी' सिनेमाच्या सिक्वेलसंदर्भात एक मोठं अपडेट आलं आहे.
अनेक धाटणीचे बॉलिवूड सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. यातले काही सिनेमे हे सिक्वल असतात तर काही ओरिजिनल. एखाद्या सिनेमानं बॉक्स ऑफिसच्या पडद्यावरील खणखणीत कामगिरी केली की त्या सिनेमाचा सिक्वेल व्हावा, अशी मागणी निर्मात्यांची आणि सिनेरसिकांचीदेखील असते. यातच आता अभिनेता कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) 'सोनू के टीटू की स्वीटी' सिनेमाचा सिक्वेलची चर्चा रंगली आहे.
कार्तिक आर्यनबॉलिवूडच्या मोस्ट टॅलेंटेड अभिनेत्यांपैकी पैकी एक आहे. सध्या अभिनेत्याची 'भूल भूलैया-3' मुळे सर्वत्र चर्चा होताना दिसते. त्याचा हा सिनेमा दणक्यात कमाई करतोय. कार्तिक आर्यन त्याच्या अभिनयानेच नाही तर हसतमुख स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकतो. कार्तिकच्या करिअरचा आलेख 'सोनू के टीटू की स्वीटी' सिनेमानं उंचावला होता. या कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावले होते. आता चित्रपटाचा अधिकृत सिक्वेलवर काम सुरू आहे.
Sacnilk च्या वृत्तानुसार, कार्तिक आणि लव रंजन यांच्यात 'सोनू के टीटू की स्वीटी 2' बद्दल बोलणं झालं आहे. 2025 च्या उत्तरार्धात चित्रीकरण सुरू करण्याची योजना आहे. लव रंजन सध्या या रोमँटिक कॉमेडीच्या दुसऱ्या भागाची पटकथा लिहित आहेत. पण, 'सोनू के टीटू की स्वीटी 2'मध्ये कथा जिथे संपली तिथून सुरू होईल, की दुसऱ्या भागात सिनेमाची कथा पूर्णपणे नवी असेल, हे अद्याप निश्चित झालेले नाही. दरम्यान, सिक्वेलवर अधिकृतपणे कार्तिक किंवा लव रंजन यांनी कोणीही भाष्य केलेलं नाही.