OMG! कार्तिक आर्यन घाबरला अन् तापसी पन्नूच्या हातून सिनेमा निसटला!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 02:49 PM2019-01-27T14:49:38+5:302019-01-27T14:51:47+5:30
७० च्या दशकातील सुपरहिट चित्रपट ‘पति, पत्नी और वो’चा रिमेक येणार हे कन्फर्म झाले आणि तेव्हापासून हा सिनेमा चर्चेत आला. या रिमेकमध्ये आधी अभिनेत्री तापसी पन्नूची वर्णी लागली आणि एकदिवस अचानक तापसीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
७० च्या दशकातील सुपरहिट चित्रपट ‘पति, पत्नी और वो’चा रिमेक येणार हे कन्फर्म झाले आणि तेव्हापासून हा सिनेमा चर्चेत आला. या रिमेकमध्ये आधी अभिनेत्री तापसी पन्नूची वर्णी लागली आणि एकदिवस अचानक तापसीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तापसी आऊट झाल्यावर तिच्याजागी भूमी पेडणेकर हिला हा चित्रपट मिळाला. या सगळ्या एपिसोडमुळे तापसी जाम भडकली. अर्थात मेकर्सनी नेहमीप्रमाणे आपले हात वर करत, असे काहीही नसल्याचे म्हटले. चित्रपटासाठी तापसीशी संपर्क केला गेला होता. पण तिला बोर्डमध्ये घेण्याबद्दल अंतिम निर्णय झाला नव्हता, असे मेकर्सनी स्पष्ट केले. मेकर्सच्या या खुलाशानंतर तापसी आणखीच संतापली आणि आता तिचा राग शांत होण्याआधीच आणखी एक बातमी आली. त्यानुसार, तापसीला या रिमेककडून काढण्यामागे अन्य कुणाचा हात नसून चित्रपटाचा लीड अभिनेता कार्तिक आर्यन याच्या मर्जीवरून हे सगळे घडलेय.
होय, चर्चा खरी मानाल तर कार्तिक आर्यन तापसीसोबत काम करण्यास कंफर्टेबल नव्हता. तापसी आपल्यापेक्षा मोठी स्टार आहे आणि ती चित्रपटात असल्यामुळे प्रमोशनपासून तर चित्रपटापर्यंत सगळीकडे ती आपल्यवर भारी पडेल, अशी चिंता त्याला होती. याच भीतीतून त्याने म्हणे तापसीऐवजी भूमीचे नाव सुचवले आणि हा चित्रपट भूमीच्या झोळीत पडला.
मुंबई मिररशी बोलताना तापसीने या संपूर्ण प्रकरणावर संताप व्यक्त केला होता. मला अगदी शेवटच्या क्षणी निर्मात्यांनी आपला निर्णय कळवला. दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांनी मला चित्रपटातून का काढण्यात आले, याबद्दल काहीही सांगितले नाही. केवळ तुझ्याजागी दुसरी अभिनेत्री निवडली गेलीय, एवढेच त्यांनी मला सांगितले. मी निर्मात्यांशीही बोलले पण त्यांच्याकडून मला कुठलेच समाधानकारक उत्तर मिळाले नाही. या सगळ्या प्रकारामुळे मला प्रचंड मनस्ताप झाला. शिवाय माझे शेड्यूलही बिघडले. यानंतर कुठलाही चित्रपट साईन करण्यापूर्वी मी चारदा विचार करेल. ‘पति पत्नी और वो’ने माझे डोळे उघडले, असे तापसी म्हणाली होती. या नव्या खुलाशानंतर ती कशी रिअॅक्ट होते, ते बघूच.